देशातील 75 रेल्वे स्थानकांवर तिरंगा फडकणार

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकावर भारतीय रेल्वेकडून तिरंगा फडकवला जाणार आहे. या तिरंग्याची उंची तब्बल 100 फूट इतकी उंच असणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील 75 रेल्वे स्थानकांवर हा तिरंगा फडकवला जाईल. यात मुंबईतील सात रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. याबाबतची माहिती रेल्वे बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. “डिसेंबर महिन्याच्या अखेरीसपर्यंत देशातील 75 स्थानकांवर तिरंगा […]

देशातील 75 रेल्वे स्थानकांवर तिरंगा फडकणार
Follow us on

मुंबई : देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकावर भारतीय रेल्वेकडून तिरंगा फडकवला जाणार आहे. या तिरंग्याची उंची तब्बल 100 फूट इतकी उंच असणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील 75 रेल्वे स्थानकांवर हा तिरंगा फडकवला जाईल. यात मुंबईतील सात रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. याबाबतची माहिती रेल्वे बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.

“डिसेंबर महिन्याच्या अखेरीसपर्यंत देशातील 75 स्थानकांवर तिरंगा उभारला जाणार असून, हे सारे ध्वज देशातील केवळ ‘अ’ श्रेणी दर्जाच्या रेल्वे स्थानकांवरच उभारले जातील.” अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

“या कामाची सुरूवात मुंबईच्या रेल्वे स्थानकांपासून केली जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ता रवींद्र भाकर यांनी दिली आहे. तसेच, रेल्वे बोर्डाचे पत्रक येताच कामाला सुरूवात केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.”

मात्र, काही रेल्वे संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली असून, रेल्वेने प्रवाशांच्या सेवा-सुविधांकडेही इतक्या गंभीरतेने लक्ष दयायला हवे.