आता भारतीय नौसेनाही अमेरिका, चीनच्या रांगेत

मुंबई : डीप-सबमर्जन्स रेस्क्यू व्हेहीकल अर्थात ‘डीएसआरव्ही’ हा जहाज नौसेनेत दाखल झाला आहे. डीएसआरव्ही प्रणालीमुळे अपघातग्रस्त पाणबुडी शोधणे, अशा पाणबुडीपर्यंत पोहोचणे आणि त्यात अडकलेल्या नौसैनिकांची सुटका करणे शक्य होणार आहे. भारतीय नौसेनेत हे जहाज आल्याने भारत आता अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन, फ्रान्स आणि जर्मनी यांसारख्या देशांच्या यादीत गणला जाणार आहे, ज्यांच्याकडे स्वत:चा पाणबुडी बचाव जहाज […]

आता भारतीय नौसेनाही अमेरिका, चीनच्या रांगेत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : डीप-सबमर्जन्स रेस्क्यू व्हेहीकल अर्थात ‘डीएसआरव्ही’ हा जहाज नौसेनेत दाखल झाला आहे. डीएसआरव्ही प्रणालीमुळे अपघातग्रस्त पाणबुडी शोधणे, अशा पाणबुडीपर्यंत पोहोचणे आणि त्यात अडकलेल्या नौसैनिकांची सुटका करणे शक्य होणार आहे. भारतीय नौसेनेत हे जहाज आल्याने भारत आता अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन, फ्रान्स आणि जर्मनी यांसारख्या देशांच्या यादीत गणला जाणार आहे, ज्यांच्याकडे स्वत:चा पाणबुडी बचाव जहाज आहे.

मुंबईच्या नेव्हल डॉक येथे बुधवारी आयोजित एका कार्यक्रमात डीएसआरव्हीचा नौसेनेच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. यावेळी नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा, नौदलाच्या पश्चिम तळाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘डीएसआरव्ही’चा नौसेनेत समावेश करण्यात आला. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे आता भारत त्या देशांच्या पंक्तीत येऊन बसला आहे, ज्यांच्याकडे पाणबुडी बचाव क्षमता आहे. आता भारतीय नौसेना समुद्रात बुडणाऱ्या पाणबुड्यांना वाचवण्यात सक्षम आहे. यामध्ये अत्याधुनिक तांत्रीक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. याला नौसेनेत समाविष्ट करण्याआधी याच परिक्षण करण्यात आलं आहे. असे नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी या कार्यक्रमात सांगितले. एप्रिल 2019 अखेरपर्यंत आणखी एक डीएसआरव्ही नौदलात दाखल होईल. नौदलाच्या विशाखापट्टणम् तळावर हे दुसरे जहाज ठेवण्यात येणार असल्याचेही लांबा यांनी स्पष्ट केले.

डीएसआरव्हीच्या परीक्षणाबाबत सांगताना कॅप्टन अरुण जॉर्ज यांनी सांगितले की, “या जहाजाला नौसेनेत घेण्याआधी त्याचे परीक्षण करण्यात आले. हे परीक्षण 60 दिवस चालले. यापैकी 32 दिवस हे परीक्षण समुद्रात झाले. याच्या मदतीने आप्तकालीन परिस्थित अडचणीत अडकलेल्या पाणबुडीला बघता येणार आहे, तसेच तिच्या वास्तविक स्थितीचे आकलन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे अपघातग्रस्त पाणबुड्यांमध्ये अडकलेल्या जवानांना वाचवणे शक्य होणार आहे.”

डीएसआरव्हीसाठी 2016 साली भारतीय नौदलाने ब्रिटनच्या मेसर्स जेम्स फिशर डिफेंन्स या कंपनीशी दोन हजार कोटींचा करार केला केला होता.  हे जहाज एकावेळी 14 लोकांना वाचवू शकते. परीक्षणादरम्यान डीएसआरव्हीने समुद्रात 650 मीटर खोलपर्यंत बुडी घेतली, जो एक विक्रम आहे. डीएसआरव्हीला एअरक्राफ्टच्या मदतीने देश-विदेशातही घेऊन जाता येतं.

काय आहेत डीएसआरव्हीची वैशिष्ट्ये?

अत्याधुनिक तंत्र

33 टन वजन

समुद्रात 650 मीटर खोल जाण्याची क्षमता

आप्तकालीन परिस्थित अडचणीत अडकलेल्या पाणबुडीचे लाईव्ह फोटो काढण्यात सक्षम

एकावेळी 14 लोकांना वाचवण्याची क्षमता

दोन व्यवस्थांवर 2000 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.