रशियाच्या नाकावर टिच्चून भारताची झेप, 5 कारणांमुळे चंद्रयान-2 मोहिम महत्त्वाची

भारताच्या चंद्रयान-2 मोहिम अनेक कारणांनी विशेष आहे. त्यामध्ये आपली क्षमता सिद्ध करण्यापलिकडे अनेक उद्देश सफल झाले आहेत. त्यापैकी प्रमुख 5 कारणं.

रशियाच्या नाकावर टिच्चून भारताची झेप, 5 कारणांमुळे चंद्रयान-2 मोहिम महत्त्वाची
Follow us
| Updated on: Jul 22, 2019 | 4:38 PM

श्रीहरीकोटा : भारताच्या चंद्रयान-2 मोहिम अनेक कारणांनी विशेष आहे. त्यामध्ये आपली क्षमता सिद्ध करण्यापलिकडे अनेक उद्देश सफल झाले आहेत. त्यापैकी प्रमुख 5 कारणं खालीलप्रमाणे.

1.वैज्ञानिक क्षमता दाखवून देणे

या मोहिमेआधी इस्रोच्या वैज्ञानिकांनी रशियाकडे लँडर आणि रोव्हरची मागणी केली होती. मात्र, रशियाने नकार दिल्याने भारताच्या वैज्ञानिकांनी स्वतः लँडर आणि रोव्हरची निर्मिती केली. नोव्हेंबर 2007 मध्ये रशियाची अंतराळ संस्था रॉस कॉसमॉसने भारताच्या चंद्रयान मोहिमेसाठी लँडर देण्याचं मान्य केलं होतं. यानंतर 2008 मध्ये इस्रोला या मोहिमेसाठी सरकारकडूनही परवानगी मिळाली. 2009 मध्ये चंद्रयान-2 चे डिझाईन तयार होते. जानेवारी 2013 मध्ये याचं लाँचिंग करणं निश्चित होतं, मात्र रशियाची अंतराळ संस्था रॉसकॉसमॉसने लँडर देऊ शकणार नाही असं कळवलं. त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने स्वतः लँडर तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम हाती घेतलं. आजच्या या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने आपण कुणावरही अवलंबून नसल्याचे सिद्ध केलं.

2.इस्रोच्या या पावलानं आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधनात भारताला सन्मानाचं स्थान दिलं

जागतिक स्तरावरील चंद्र मोहिमांचा विचार करता चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या निवडक 6 देशांपैकी एक होईल. सॉफ्ट लँडिंग म्हणजे लँडर आणि रोव्हरसह इतर कोणत्याही साधनांना नुकसान होणार नाही इतक्या अचुकपणे पृष्ठभागावर उतरणे. आतापर्यंत अमेरिका, रशिया, युरोप, चीन आणि जपान या पाचच देशांनी हे यश मिळवले होते. आता यात भारताचाही समावेश होईल. चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर उतरवण्यात खूपच कमी देशांना यश मिळाले आहे. यात अमेरिका, रशिया आणि चीनचा समावेश आहे. आता भारत चौथा देश असेल.

3.चंद्रावरील सर्वात आव्हानात्मक पृष्ठभागाची (दक्षिण ध्रुव) निवड

चंद्रावर याआधी अनेक देशांनी अनेक मोहिमा केल्या, मात्र चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्याची कुणाचाही हिंमत झाली नाही. या उलट इस्रोने आपल्या दुसऱ्याच चंद्र मोहिमेत दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा निर्णय घेतला. याचा उपयोग भविष्यातील अधिक कठोर मोहिमा यशस्वी करण्यासाठी होईल.

4.सर्वात शक्तीशाली 15 मजली उंच ‘बाहुबली’ रॉकेट GSLV MK-III चा वापर

‘चंद्रयान-2’ चं प्रक्षेपण भारताच्या सर्वात शक्तिशाली जीएसएलवी मार्क-III (GSLV MK-III) रॉकेटने करण्यात आले. या रॉकेटला ‘बाहुबली’ नाव देण्यात आलं आहे. रॉकेट बाहुबलीचं वजन 640 टन आहे. हे रॉकेट भारतातील आतापर्यंतचे सर्वात उंच रॉकेट आहे. याची उंची 44 मीटर म्हणजेच 15 मजली इमारती इतकी आहे. हे रॉकेट 4 टन वजनाच्या सॅटेलाईटला अवकाशात घेऊन जाण्यास सक्षम आहे. यात 3 टप्प्याचे इंजिन आहे.

5.चंद्रावर इस्रोचं जगाला अचंबित करणारं अनोखं संशोधन

चंद्रयान-2 चं विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील भूकंपाचाही तपास करणार आहे. तेथे ‘थर्मल’ आणि ‘लुनार डेंसिटी’चीही माहिती गोळा केली जाईल. रोव्हर चंद्रावरील रसायनांचाही शोध घेईल. तापमान आणि वातावरणात आद्रता (Humidity) आहे का आणि असेल तर किती याचीही माहिती भारतीय संशोधकांना मिळेल. भारताच्या चंद्रयान-1 मोहिमेने याआधी चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचे पुरावे गोळा केले होते. आता या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर आणि त्याखाली कुठपर्यंत पाणी आहे याचाही शोध घेतला जाईल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.