भारतातील सर्वात सुरक्षित कारचा अपघात, कारचा चक्काचूर, इंजिन थेट रस्त्यावर

| Updated on: Dec 17, 2019 | 7:16 PM

दिल्ली जवळील नोएडा येथे एक भयानक अपघात पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ज्या कारचा अपघात झाला त्या कारला भारतातील सर्वात सुरक्षित गाडीचा दर्जा प्राप्त आहे.

भारतातील सर्वात सुरक्षित कारचा अपघात, कारचा चक्काचूर, इंजिन थेट रस्त्यावर
Follow us on

नवी दिल्ली : दिल्ली जवळील नोएडा येथे एक भयानक अपघात पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ज्या कारचा अपघात झाला त्या कारला भारतातील सर्वात सुरक्षित गाडीचा दर्जा प्राप्त आहे (Noida Car Accident). नोएडाच्या बॉटनिकल बागेजवळ टाटा नेक्सॉन (Tata Nexon Accident) ही कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर धडकली. या अपघातात कार चालक गंभीररित्या गखमी झाला आहे. मात्र, देशातील सर्वात सुरक्षित गाडीचा दर्जा असणाऱ्या टाटा नेक्सॉनचा इतका भयानक अपघात झाल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे (India’s Safest Car Tata Nexon).

टाटा नेक्सॉनचा बॉटनिकल बागेजवळ झालेला अपघात अतिशय भयंकर होता (India’s Safest Car Tata Nexon). ही धडक इतकी जबरदस्त होती की गाडीचं चक्क गाडीच्या बाहेर आलं. ही गाडी चालवणाऱ्या चलकालाही मोठी गंभीर दुखापत झाली आहे. त्याला सध्या जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, चालकाची स्थिती गंभीर असल्याची माहिती आहे.

या अपघाताचे फोटो पाहिल्यावर अपघाताची तीव्रता लक्षात येते. भरधाव वेगात असलेल्या या गाडीला चालक नियंत्रित करु न शकल्याने हा अपघात झाला. या अपघातानंतर गाडीचं इंजिन थेट रस्त्यावर आलं. थंडीच्या दिवसांमध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये अशा प्रकारच्या अपघातांमध्ये वाढ होते.

या अपघातात टाटा नेक्सॉन ही गाडीचं मोठं नुकसान झालं. गाडीच्या काचाही फुटल्या. या गाडीला भारतातील सर्वात सुरक्षित गाडीचा दर्जा प्राप्त आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या गाडीला 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे.