यावेळी हनुमानाला जास्त त्रास झाला, दिल्लीतही एवढा त्रास झाला नव्हता : गिरीश महाजन

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. शेतकरी प्रश्न आणि लोकपालसंबंधी सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विविध मागण्यांसाठी तातडीने समिती नियुक्त केली […]

यावेळी हनुमानाला जास्त त्रास झाला, दिल्लीतही एवढा त्रास झाला नव्हता : गिरीश महाजन
Follow us on

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. शेतकरी प्रश्न आणि लोकपालसंबंधी सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विविध मागण्यांसाठी तातडीने समिती नियुक्त केली जाणार आहे. साडे पाच तास मुख्यमंत्री आणि अण्णा यांच्यामध्ये चर्चा सुरु होती.

अण्णांच्या सात दिवसांच्या उपोषणात सर्वात जास्त धावपळ केली ती म्हणजे गिरीश महाजन यांना. मुंबई ते राळेगण असा प्रवास त्यांनी या सात दिवसात अनेकदा केला. दिल्लीतल्या उपोषणाच्या वेळीही त्यांनी मध्यस्थी केली होती. पण दिल्लीतल्या उपोषणापेक्षाही यावेळी हनुमानाला जास्त त्रास झाला, असं गिरीश महाजन मिश्कील शैलीत म्हणाले.

वाचाहे वाचाच, भारतीय म्हणून तुम्हालाही अण्णा हजारेंचा अभिमान वाटेल!  

अण्णांनी दिल्लीत उपोषण केलं तेव्हा मुंबई ते दिल्ली आणि दिल्लीत पंतप्रधान कार्यालय अशा फेऱ्या मारत गिरीश महाजनांनी सरकारचे प्रस्ताव अण्णांपर्यंत नेले. पण यावेळी अण्णा प्रस्ताव नको, ठोस निर्णय हवा या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम होते. गिरीश महाजन यांनी काल तीन तास चर्चा केली. पण ती निष्फळ ठरली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि केंद्री कृषीमंत्री राधामोहन सिंह हे राळेगणमध्ये आज दाखल झाले. दुपारी 2 वाजता सुरु झालेली बैठक साडे सात वाजेपर्यंत चालली. जवळपास सहा तासांच्या या बैठकीमध्ये उपोषणावर तोडगा काढण्यात आला.

लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाच्या सातव्या दिवशी गावकऱ्यांनी आज चूलबंद आंदोलन केलं. काही शेतकरी बैलगाडी आणि बैलांसह उपोषणात सहभागी झाले.