IndiGo Flight Cancellation: संताप, संताप, संताप! कोणी काऊंटरवर चढले, तर काहींचे डोळे डबडबले…इंडिगोमुळे प्रवाशांचे हाल
IndiGo Flight Delay: इंडिगो फ्लाईट रद्द झाल्यामुळे प्रवाशांचा संताप, संताप अन् संताप सुरू आहे. गेल्या पाच दिवसांपासून इंडिगो माती खात आहे. प्रवाशांचे आतोनात हाल होत असताना मायबाप सरकार मात्र त्याची गंमत पाहत असल्याने यात्रेकरूंचा संताप अनावर झाल्याचे दिसून आले.

IndiGo Flight Cancelled: इंडिगोची विमानं जमिनीवरच आहेत. एकामागून एक उड्डाणं रद्द होत आहे. फ्लाईट रद्द झाल्यामुळे प्रवाशांचा संताप, संताप आणि संताप सुरू आहे. पाच दिवसांपासून विमानतळावरील श्रीमंतांची दमकोंडी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून इतका अभूतपूर्व गोंधळ सुरू असताना, प्रवाशांचे हाल होत असताना या करदात्यांकडं ढुकूंनही पाहायला सरकार दरबारी कुणालाच वेळ नसल्याचे दिसून येत आहे. कडाक्याच्या थंडीत प्रवाशांवर विमानतळावरच ठिय्या मांडून बसण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या विमानतळावरील गदारोळ पाहिला तर अनेकांना कापरं भरेल अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. फ्लाईट रद्द होण्याचा आज पाचवा दिवस आहे. तरीही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे नाराज प्रवाशांचा राग अनावर झाला आहे.
राग अनावर, महिला काऊंटरवर
एक विमानतळावर परदेशी महिलेचा राग अनावर झाला. तिने थेट काऊंटरवरच धाव घेतली. इंडिगोचे कर्मचारी तिला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले. या महिलेचे सर्व सामान बॅगमध्ये पॅक केलेले आहे. पर्याय म्हणून अतिरिक्त कपडे तिने वर काढलेले नाही. ती इतर त्रस्त प्रवाशांना मदत करत होती. पण आता तिलाही साध्या साध्या सुविधांसाठी झगडावं लागत आहे. तिला पाणी सुद्धा मिळत नसल्याचे ती म्हणाली. तात्काळ जेवणाची व्यवस्था करा म्हणून ही महिला थेट काऊंटरवर चढली. अखेर इंडिगोचे कर्मचारी तिला शांत करण्यात यशस्वी ठरले. इतर अनेक प्रवाशांचा संताप या कर्मचाऱ्यांनाच सहन करावा लागत आहे.

प्रवासी मोठ्या अडचणीत
अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी लांबच लांब रांग दिसल्या. अनेक महिला प्रवाशांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले. वारंवार फ्लाईट रद्द होत असल्याने त्यांना आता पुढे काय करावे. कुणाला मदतीला बोलवावे असे झाले. काही महिलाप्रवाशांसोबत लहान मुलं असल्याने त्यांचा जीव कासावीस झाला. जेवणाची आणि पाण्याच्या व्यवस्थेसाठी त्यांना झगडावे लागले.
#WATCH | Gujarat: A passenger weeps at Sardar Vallabhbhai Patel International Airport in Ahmedabad, long queues of passengers seen here as a few IndiGo flights stand cancelled yet again.
The Flight Duty Time Limitations (FDTL) orders of the DGCA have been placed in abeyance with… pic.twitter.com/8qmI72w2uN
— ANI (@ANI) December 6, 2025
डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने(DGCA) फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन (FDTL) ऑर्डर तात्काळ थांबवले. अनेक दिवसांपासून देशभरात होत असलेला उशीर आणि फ्लाईट रद्दच्या प्रकारानंतर हा आदेश आला. त्याचा थेट परिणाम इंडिगोच्या कामकाजावर दिसला. यामुळे सर्वच श्रेणीतील प्रवाशांना मोठा फटका बसला.
आज पण अनेक फ्लाईट्स रद्द
आज इंडिगोच्या एकूण 452 फ्लाईट रद्द झाल्या आहेत. यामध्ये हैदराबाद 69, दिल्ली 106, मुंबई 109, चेन्नई 48, अहमदाबाद 19, हैदराबाद 69, जयपूर 6, चंडीगढ़ 10, विशाखापट्टणम 20 फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या काऊंटरवर मोठ्या रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी कंपनीने प्रवाशांना पैसे परत केले आहेत. तर काही ठिकाणी ही प्रक्रिया सुरू आहे. तर इतर विमान कंपन्यांनी या गोंधळाचा फायदा उचलत तिकीट दर दुप्पट केल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
