हे वाचाच, भारतीय म्हणून तुम्हालाही अण्णा हजारेंचा अभिमान वाटेल!

राळेगणसिद्धी : भारतातील भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा प्रमुख चेहारा म्हणजेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी या आपल्या मूळ गावी अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केले आहे. केंद्रात लोकपाल नियुक्त करावा, ही अण्णांची यावेळी मागणी आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण अण्णांच्या आंदोलनावर शंका उपस्थित करत आहेत. या शंकांना उत्तर देण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी चळवळीतील अण्णांचे प्रमुख […]

हे वाचाच, भारतीय म्हणून तुम्हालाही अण्णा हजारेंचा अभिमान वाटेल!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:30 PM

राळेगणसिद्धी : भारतातील भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा प्रमुख चेहारा म्हणजेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी या आपल्या मूळ गावी अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केले आहे. केंद्रात लोकपाल नियुक्त करावा, ही अण्णांची यावेळी मागणी आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण अण्णांच्या आंदोलनावर शंका उपस्थित करत आहेत. या शंकांना उत्तर देण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी चळवळीतील अण्णांचे प्रमुख सहकारी विश्वंभर चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरुन एक पत्रक शेअर केले आहे. त्यामध्ये अण्णांच्या आतापर्यंतच्या उपोषणांचा इतिहास आहे. हा इतिहास वाचल्यावर मराठी माणूस म्हणून आणि भारतीय नागरिक म्हणून तुम्हालाही अण्णा हजारेंचा सार्थ अभिमान वाटेल.

1980 साली एक दिवसाचं उपोषण ते 2018 सालचं 7 दिवसांचं उपोषण, या 39 वर्षात अण्णांनी एकूण 19 उपोषणं केली. या 19 उपोषणांचे दिवस मोजले तर तब्बल 145 दिवस बेरीज होते. म्हणजे, भारतातील आणि महाराष्ट्रातील जनहिताच्या विविध मुद्द्यांसाठी आतापर्यंत 145 दिवस अण्णांनी उपोषण केले आहे. तरी यात आम्ही सध्या सुरु असलेल्या उपोषणाच्या दिवसांची गणना केलीच नाही. ते जोडल्यास ही संख्या अर्थात 150 च्या वर जाते.

अण्णांच्या आतापर्यंतच्या उपोषणांमधील ठळक मुद्दे :

  • अण्णांचं पहिलं उपोषण जून 1980 मध्ये राळेगणसिद्धीत शाळा सुरु करण्यासाठी होतं. हे एक दिवसाचं उपोषण होतं.
  • लोकपाल आणि लोकायुक्ताच्या मागणीसाठी ऑगस्ट 2011 मध्ये अण्णांनी रामलीला मैदातान 13 दिवसांचं उपोषण केलं होतं. हे त्यांचं सगळ्यात मोठं उपोषण.
  • आतापर्यंत अण्णा हजारेंनी एकूण 19 उपोषणं (145 दिवस) अण्णांनी केली.
  • अण्णांनी महाराष्ट्र सरकारविरोधात 13 वेळा उपोषणं आणि केंद्र सरकारविरोधात 6 वेळा उपोषणं केली.
  • अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे आतापर्यंत 6 कॅबिनेट मंत्री आणि 500 हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना घरी बसावं लागलं आहे.

अण्णा हजारेंच्या आतापर्यंतच्या उपोषणांची यादी :

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.