Corona Effect : राज्यातील कच्च्या कैद्यांना तात्पुरता जामीन द्या, कारागृह महानिरीक्षकांची न्यायालयाकडे मागणी

| Updated on: Mar 18, 2020 | 9:49 AM

जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हा आजार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक प्रयत्न करत (Government release prisoners on bail) आहेत.

Corona Effect : राज्यातील कच्च्या कैद्यांना तात्पुरता जामीन द्या, कारागृह महानिरीक्षकांची न्यायालयाकडे मागणी
Follow us on

पुणे : जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हा आजार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक प्रयत्न करत (Government release prisoners on bail) आहेत. या आजाराचा धोका जेलमधील कैद्यांनाही असल्याने यामधील काही कच्च्या कैद्यांना तात्पुरता जामीन द्यावा, अशी विनंती कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद न्यायालयाकडे करणार आहेत, असं त्यांनी पत्रकार परिषदेत (Government release prisoners on bail) सांगितले.

राज्यातील 60 तुरुंगात 38 हजार बंदी कैदी आहेत. यापैकी साडे आठ हजार शिक्षा झालेले गुन्हेगार आहेत. तर उरलेले कच्चे कैदी आहेत. या कच्या कैद्यांपैकी जे छोट्या गुन्ह्यांमधे शिक्षा झालेले कैदी आहेत. अशांना तात्पुरता जामीन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

राज्यातील तुरुंगातील 38 हजार कैद्यांची कोरोना विषाणू आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर विशेष कारागृहात दक्षता घेतली जात आहे. तसेच यापुढील काळात न्यायालयात कैद्यांना हजर केले जाणार नाही. कैद्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार आहे. तसेच कारागृहमधील आवक जावक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कारागृहातील कर्मचारी, कैदी यांची कारागृहाच्या गेटवर तपासणी केली जाईल. भविष्यात गरज पडल्यास तुरुंगामध्येच कोरन्टाइनची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर तुरुंगातील कैद्यांना पंधरा दिवस नातेवाईकांना भेटता येणार नाही. ते फोनद्वारे कुटुंबीयांसोबत संपर्क करु शकणार आहेत. त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संबधित बातम्या : 

Corona Effect : कोरोनाच्या भीतीने विद्यार्थी चालले गावाला, खासगी बसेसकडून प्रवाशांची लूट

Corona Effect | मुंबईतील ऑर्केस्टा, पब आणि डान्सबार 31 मार्चपर्यंत बंद, मुंबई पोलिसांचे आदेश