घरासमोर फटाके फोडण्यास मनाई करताच मद्यधुंद तरुणांची वृद्धेसह कुटुंबाला मारहाण; कल्याणमध्ये खळबळ

| Updated on: Nov 18, 2020 | 3:39 PM

या मद्यपी तरुणांनी वृद्धेसह तिच्या नातवालाही जबर मारहाण केल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात असून या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

घरासमोर फटाके फोडण्यास मनाई करताच मद्यधुंद तरुणांची वृद्धेसह कुटुंबाला मारहाण; कल्याणमध्ये खळबळ
Follow us on

कल्याण : घरासमोर फटाके फोडण्यास मनाई केल्याने संतप्त झालेल्या चौघा मद्यपी तरुणांनी एका कुटुंबातील (Kalyan Family Beaten) तिघांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या मद्यपी तरुणांनी वृद्धेसह तिच्या नातवालाही जबर मारहाण केल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात असून या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे (Kalyan Family Beaten).

कोरोना असल्यामुळे दिवाळीत फटाके वाजवू नये, असे आवाहन सराकरने केले होते. नागरिकांनी याला प्रतिसादही दिला. मात्र, काही लोक आहेत जे सरकारच्या आदेशांनासुद्धा धाब्यावर बसवतात. इतकेच नाही तर दुसऱ्यांना त्रस होईल अशा प्रकारे वागतात. असाच एक प्रकार कल्याणच्या शिवाजी वालधूनी परिसरात घडला आहे. या परिसरात राहणारे अभिजीत वाघमारे भाऊबीजेच्या दिवशी घरी असताना रात्री दहा वाजताच्या सुमारास आजूबाजूचे काही तरुण त्यांच्या घरासमोर मोठ्या आवाजाचे फटाके वाजवत होते. वाघमारे यांनी त्यांना विनंती केली की, फटाक्याचा आवाज होत आहे. त्याच्या ठिणग्या सुद्धा घरात येत आहेत. घरात लहान मुलगा आणि आजीला त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे घरासमोर फटाके फोडू नका.

मात्र, दारुच्या नशेत असलेल्या तरुणांनी काही एक न ऐकता अभिजीतला घराबाहेर बोलावून त्याला जोरदार मारहाण केली. त्यामुळे अभिजीतच्या डोळ्याखाली जबर जखम झाली आहे. अभिजीतला मारहाण होत असताना त्याची आई उषा वाघमारे या मध्यस्थी करण्यासाठी आल्या तेव्हा त्यांच्याशीही असभ्य वर्तन या तरुणांनी केले. त्यांच्या अंगावरील कपडे खेचून त्यांनाही मारहाण करण्यात आली.

इतकेच नाही तर त्यांच्या वयोवृद्ध आजीलाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचे नाक फुटून रक्त वाहू लागले. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, वैद्यकीय प्रमाणपत्र आल्यावर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल, असे कल्याणचे एसीपी अनिल पोवार यांनी सांगितले आहे.

Kalyan Family Beaten

संबंधित बातम्या :

50 हून अधिक घरफोडी करणारे सर्राइत चोरटे जेरबंद, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

दीड वर्षांपासून लपाछपीचा खेळ, नागपूर पोलिसांनी वाँटेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या, 20 लाखांचं चोरी केलेलं सोनं जप्त

दहशत माजविण्यासाठी स्थानिक गावगुंडाकडून घरातील सामान, गाड्यांची तोडफोड, कल्याण पूर्वेतील प्रकार