हुशार चोरांनी 100 किलोची तिजोरी तलावात लपवली, तरबेज पोलिसांनी चुटकीसरशी पकडलं

| Updated on: Jul 18, 2020 | 11:57 AM

कांदिवलीत चोरांनी हुशारीने चोरीचा माल दडवला, मात्र, पोलिसांनी हुशारीने चोरांच्या मुसक्या आवळल्या (Kandivali Police arrest thief with 100 Kg Vault).

हुशार चोरांनी 100 किलोची तिजोरी तलावात लपवली, तरबेज पोलिसांनी चुटकीसरशी पकडलं
Follow us on

मुंबई : मुंबई उपनगरातील कांदिवलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये एका वाईन शॉपमध्ये चोरी झाली. यात 100 किलोग्रॅमच्या तिजोरीसह कम्प्युटर आणि लाखो रुपयांचे सामान चोरीला गेला. चोरांनी अत्यंत हुशारीने चोरीचा माल दडवला, मात्र, कांदिवली पोलिसांनी हुशारीने सीसीटीव्हीच्या मदतीने चोरांच्या मुसक्या आवळल्या (Kandivali Police arrest thief with 100 Kg Vault). तसेच वाईन शॉपमधून चोरीला गेलेली तिजोरीही थेट तलावातून जप्त केली.

कांदिवली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधित चोरीतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तलावामधून 100 किलो वजन असलेली तिजोरी, बार आणि वाईन शॉपचे 7 लायसन्स, कम्प्युटर आणि लाखो रुपयांचं सामान जप्त केलं. या चोर फक्त तिजोरीच नाही, तर लाखो रुपयांची दारुही चोरुन फरार झाले होते.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या प्रकरणाचा तपास करत असताना चोरांनी तिजोरी मालवणीमधील एका तलावात लपवल्याचं समोर आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव हारुन सरदार असं आहे. तो मालवणीमध्येच राहणारा आहे. त्याच्याविरोधात मुंबईमध्ये 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. हारुन हा सराईत गुन्हेगार असून ज्याला 3 पत्नी आहेत. त्याने तिघींना मालाडच्या वेगवेगळ्या भागात ठेवले आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

2 जुलैच्या रात्री संबंधित चोरांनी कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या एका वाईन शॉपमधून तिजोरी आणि लाखो रुपयांचं सामान चोरलं. यानंतर चोर पसार झाले. या सराईत चोरांनी आपली हुशारी दाखवत दुकानामध्ये लागलेल्या सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीनही चोरले. पण शेवटी कर्तव्यदक्ष कांदिवली पोलिसांनी चुटकीसरशी चोराला सर्व सामनासह अटक केली. कांदिवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंदुकले यांनी याबाबत माहिती दिली.

हेही वाचा :

पुण्यात कोव्हिड रुग्णालयात खासगी डॉक्टरांना 15 दिवस सेवासक्ती, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Live Update : पुण्यात जिल्ह्यात 12 तासात 462 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

पुण्यात कोरोनाबाधितांवर घरीच उपचार, ‘त्या’ पॉझिटिव्ह रुग्णांनाही घरीच पाठवणार

Kandivali Police arrest thief with 100 Kg Vault