AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात कोरोनाबाधितांवर घरीच उपचार, ‘त्या’ पॉझिटिव्ह रुग्णांनाही घरीच पाठवणार

पुण्यात वाढते कोरोना रुग्ण आणि त्यासाठी आवश्यक बेड उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे (Corona Updates of Pune Home treatment).

पुण्यात कोरोनाबाधितांवर घरीच उपचार, 'त्या' पॉझिटिव्ह रुग्णांनाही घरीच पाठवणार
| Updated on: Jul 18, 2020 | 9:22 AM
Share

पुणे : पुण्यात वाढते कोरोना रुग्ण आणि त्यासाठी आवश्यक बेड उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे (Corona Updates of Pune Home treatment). यानुसार पुण्यात कोणतीही लक्षणं नसलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर घरीच उपचार होणार आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यातील सर्व खासगी रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत. खासगी रुग्णालयातही बेड उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबबत माहिती दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांवर घरीच उपचार करण्याबाबत निर्देश दिले आहेत. अशा रुग्णांचे समुपदेशन करुन घरीच उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयातही बेड उपलब्ध नसल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला. याबाबत पुण्यातील खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर सूचना दिल्या. विशेष म्हणजे रुग्णालय प्रशासनानं नियमांचं पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशाराही दिला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (18 जुलै) दिवसभरात 1904 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्याची आकडेवारी 46 हजार 872 वर पोहचली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात दिवसभरात 29 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 1243 वर पोहचली. शुक्रवारी दिवसभरात 773 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 21 हजार 107 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

पुणे शहरात रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यानं अनेक रुग्णांना वेळेवर बेड मिळत नसल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त होत आहेत. मात्र, वाढणारी रुग्णसंख्या पाहता पालिका झपाट्यानं कामाला लागली आहे. शहरातील विमाननगरमध्ये एसआरए इमारतीत, भारत जैन संघटना, इस्कॉन, आणि बजाज संघटनेच्या मदतीनं पालिकेनं 2800 आयसोलेशन बेड तयार केले आहेत. त्यामुळे आता तात्काळ रुग्णाला बेड मिळणार असल्याची माहिती पुण्याचे महपौर मुरलीधर मोहोळ आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. शहरात विविध हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची उभारणी पालिकेच्यावतीनं करण्यात आली आहे.

पुण्यात लॉकडाऊनचा पहिला 5 दिवसांचा टप्पा आज रात्री संपणार आहे. उद्यापासून (19 जुलै) सुरु होणाऱ्या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता मिळणार आहे. उद्यापासून नागरिकांना सकाळी 8 ते दुपारी 5 वाजेपर्यंत जीवनावश्यक दुकानांसाठी वेळ वाढवून मिळणार आहे. पालिका आयुक्त आणि पुणे पोलीस यांनी विचारविनिमय करुन याबाबत निर्णय घेतला आहे. यानुसार पुढील पाच दिवस 8 ते 12 यावेळेत दुकाने सुरु राहतील. पुण्यातील 10 दिवसांचा लॉकडाऊन 23 जुलै रोजी मध्यरात्री संपणार आहे.

हेही वाचा :

कुख्यात डॉन संतोष आंबेकरलाही कोरोना संसर्ग, नागपुरातील एकूण रुग्ण संख्या 2774

Pune Lockdown | पुणेकरांकडून वारंवार नियमांचं उल्लंघन, 13 दिवसात तब्बल 8,097 नागरिकांवर कारवाई

Maharashtra Corona Update | राज्यात दोन दिवसात 16,922 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 3 लाखांच्या दिशेला

Corona Updates of Pune Home treatment

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.