Sushant case | ‘मला सांगितलं लॉक तोड, पैशाची काळजी करु नको’, चावीवाल्याची माहिती

| Updated on: Aug 22, 2020 | 2:52 PM

सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी ज्या चावीवाल्याने दरवाजाचे लॉक तोडले, त्याने टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. (keymaker Sushant singh rajput house)

Sushant case | मला सांगितलं लॉक तोड, पैशाची काळजी करु नको, चावीवाल्याची माहिती
Follow us on

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सीबीआयकडून हा तपास केला जात आहे. सीबीआयची टीम काल मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी तपासाला सुरुवात केली. यामध्ये सुशांतशी संबंधित अनेकांची चौकशी होत आहे. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी ज्या चावीवाल्याने दरवाजाचे लॉक तोडले, त्याने टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. (keymaker who opened Sushant singh rajput house)

चावीवाला काय म्हणाला?

चावीवाल्याच्या माहितीनुसार, “दरवाजा वाजवूनही आतून कोणी उघडत नव्हते, म्हणून मला फोन केला होता. सिध्दार्थ पिठानीने मला फोन केला होता. मी त्यांना दरवाजाचा फोटा काढून पाठवायला सांगितलं. त्यांनी मला व्हॉटअॅसपवर लोकेशन पाठवलं. मला फोटो पाठवल्यावर मी तिथे गेलो. लॉक तोडणे अवघड होतं. सिद्धार्थ पिठानीनं मला सांगितलं पैशाची काळजी करु नका, फक्त लवकरात लवकर या”.

माझ्यासोबत माझा भाऊ होता तोही सोबत आला होता. मी वर गेल्यावर त्यांनी मला लॉक दाखवलं. मी चावी बनवण्याचा प्रयत्न करत होतो. 5 ते 7 मिनिटे मी चावी बनवण्याचा प्रयत्न करत होतो. मी म्हटलं लॉक तोडावं लागेल. ते म्हणाले तोड.

मी स्क्रू ड्रायव्हर आणि हातोड्याने लॉक तोडलं. मी लॉक तोडत असताना सिद्धार्थ मध्ये मध्ये दरवाजाला कान लाऊन आतून काही आवाज येतो का हे ऐकत होता. आतून काय रिप्लाय येतोय का पाहात होता. पण तसं काही झालं नाही, असं चावीवाल्याने सांगितलं.

आतून काहीच हालचाल नव्हती. म्हणून त्यांनी मला लॉक तोडायला लावलं. थोडासा दरवाजा खोलल्यानंतर त्यांनी मला जायला सांगितलं. तुमचं सामान घ्या आणि जा, असं सांगितलं. मी निघेपर्यंत सगळे लोक बाहेरच होते. त्यांनी मला 2000 रुपये दिले.

सत्य बाहेर यावं
सध्या बिहार पोलीस, सीबाआय यापैकी कोणीही मला फोन केला नाही. मात्र याप्रकरणातील जे काही सत्य आहे ते बाहेर यावं, असं चावीवाल्याने सांगितलं.

जे लोक होते ते घाबरलेले दिसत नव्हते, फक्त लॉक लवकर तोडा म्हणत होते. आतमध्ये कोण आहे हेही मला माहित नव्हतं. हा सर्व तपासाचा विषय आहे, तपास होऊ द्या. त्यांनी मला आत का पाहू दिलं नाही हे मला माहित नाही. मला खाली कोण सोडायला आलं होतं त्याचं नाव मला माहित नाही. ऑनलाईन नंबर असल्यामुळं त्यांनी मला संपर्क केला. मुंबई पोलीस चांगलं काम करत होती, पण सीबीआयकडे दिली आहे तर चांगलं आहे. मी सगळ्या गोष्टी पोलिसांना सांगितल्या आहेत, असंही चावीवाल्याने सांगितलं.

(keymaker who opened Sushant singh rajput house)

संबंधित बातम्या 

Sushant Singh Rajput case | CBI पथक कूपर रुग्णालयात, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी