Dhule | कृषीकन्या प्रियांका जोशीची युवती सेनेच्या बुलडाणा-अकोला जिल्हा विस्तारकपदी नियुक्ती

आपल्या कविवेतून थेट मोदी सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या प्रियांका जोशी (Priyanka Joshi) या तरुणीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. धुळ्याची कृषीकन्या प्रियंका जोशीला युवती सेनेच्या (Yuva Sena) बुलढाणा अकोला जिल्हा विस्तारकपदी नियुक्त केलं आहे.

आपल्या कविवेतून थेट मोदी सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या प्रियांका जोशी (Priyanka Joshi) या तरुणीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. धुळ्याची कृषीकन्या प्रियंका जोशीला युवती सेनेच्या (Yuva Sena) बुलढाणा अकोला जिल्हा विस्तारकपदी नियुक्त केलं आहे. युवतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावं नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी प्रियांका जोशीला महत्त्वाचं पद देण्यात आलं.

प्रियांका जोशी ही चार वर्षापूर्वी शेतकरी आंदोलनावेळी चर्चेत आली होती. शिवसेनेने नाशिकमध्ये शेतकरी मेळावा घेतला होता. “आमचा बाप कन्यादानापर्यंत टिकला पाहिजे, म्हणून कर्जमाफी मागतोय” असं खणखणीत भाषण करणारी प्रियांका त्यावेळी चर्चेत आली होती. याशिवाय प्रियांकाने मोदींवर केलेली कविताही खूपच गाजली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI