टेक ऑफ करताच हवेतच विमानाचं चाक निघालं, प्रवाशाच्या फोनमध्ये संपूर्ण घटना कैद

कॅनडाच्या मॉन्ट्रियल ट्रूडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. या विमानतळावर एका विमानाचे उड्डाण घेताच मुख्य लँडिंग गेअरचं एक चाक अचानक गळून पडलं (Landing Wheel of plane break).

टेक ऑफ करताच हवेतच विमानाचं चाक निघालं, प्रवाशाच्या फोनमध्ये संपूर्ण घटना कैद
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jan 07, 2020 | 12:48 PM

ओटावा : कॅनडाच्या मॉन्ट्रियल ट्रूडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. या विमानतळावर एका विमानाचे उड्डाण घेताच मुख्य लँडिंग गेअरचं एक चाक अचानक गळून पडलं (Landing Wheel of plane break). विमानात बसलेल्या एका प्रवाशाने आपल्या फोनमध्ये हा व्हि़डीओ रेकॉर्डही केला आहे. असं असलं तरी पायलटच्या प्रसंगावधानामुळे विमानातील 49 प्रवासी सुखरुप आहेत.

एअर कॅनडाचं 8684 नंबरचं विमान ट्रूडो आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बगोटविलसाठी उडालं. विमानाने उड्डाण करताच विमानाच्या लँडिंग गेअरच्या एका चाकाच्या जवळ थिणग्या निघून आग लागल्याचं एका प्रवाशाला दिसलं. काही वेळातच या गेअरचं एक चाक गळून पडलं. संबंधित प्रवाशाने याचा व्हिडीओ देखील काढला आहे.

लँडिग गेअरचं चाक गळाल्याचं पाहिल्यानंतर संबंधित प्रवाशाने याची माहिती तात्काळ विमान पायलटला दिली. यानंतर पायलटने विमानाला पुन्हा एअरपोर्टवर सुरक्षित उतरवलं. प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केला.

जेज एव्हिएशनचे प्रवक्ते मेनन स्टुअर्ट यांनी घटनेवर बोलताना सांगितलं, की “विमानाचे पायलट अत्यंत अनुभवी होते. त्यांनी ही दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण आणलं आणि विमान पुन्हा विमानतळावर सुरक्षित उतरवलं. फ्लाईट ऑपरेटरने देखील पायलटच्या साहसाचं कौतुक केलं. विमानाच्या चाकांना आग लागण्याचं आणि गळून पडण्याच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें