“भारतात रेस्टॉरंट सुरु करण्यापेक्षा बंदुकीचं लायसन्स मिळवणं सोपं”

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण 2020 मध्ये लायसन्साठी येणाऱ्या अडचणींचा पुनरुच्चार केला आहे (Economic Survey on Licence of Restaurant).

भारतात रेस्टॉरंट सुरु करण्यापेक्षा बंदुकीचं लायसन्स मिळवणं सोपं
Follow us
| Updated on: Feb 01, 2020 | 11:05 AM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण 2020 मध्ये लायसन्साठी येणाऱ्या अडचणींचा पुनरुच्चार केला आहे (Economic Survey on Licence of Restaurant). सीतारमण यांनीच स्वतः भारतात रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी लायसन्स मिळवण्यापेक्षा बंदूकीचं लायसन्स मिळवणं सोपं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हे लायसन्स राज बंद करणं महत्त्वाचं असल्याचं मत सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षणात केलं (Economic Survey on Licence of Restaurant).

जगभरात हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करणे हे रोजगार आणि विकासाचे महत्त्वाचे घटन असल्याचंही उदाहरण सर्वेक्षणात देण्यात आलं आहे. भारतात मात्र, रेस्टॉरन्ट सुरु करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यालाच अर्थमंत्री सीतारमण यांनी दुजोरा दिला आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक मंजूऱ्या घ्याव्या लागतात.

भारतात एखादं रेस्टॉरन्ट सुरु करण्यासाठी जितकी कागदपत्रं जमा करावी लागतात, त्यापेक्षा कमी कागदपत्रांमध्ये कोणताही नागरिक बंदूकीचा परवाना (लायसन्स) मिळवू शकतो. अगदी शेजारी देशांमध्ये देखील रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी अत्यंत कमी कागदपत्रांची आवश्यकता लागते. चीन आणि सिंगापूरमध्ये तर केवळ 4 परवाने घेऊन कुणालाही रेस्टॉरंट सुरु करता येतं.

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने (NRAI) सांगितलं, की बंगळुरु शहरात एक रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी 36, दिल्लीत 26 मंजूऱ्या घ्याव्या लागतात. दिल्ली आणि कोलकातामध्ये तर ‘पोलीस इटिंग हाऊस लायसन्स’ देखील घ्यावं लागतं. दिल्लीत पोलिसांकडून हा परवाना घेण्यासाठी 45 कागदपत्रं लागतात.

दुसरीकडे देशात बंदुकीचा परवाना घेण्यासाठी 19 आणि मोठ्या बंदूकीच्या परवान्यासाठी 22 कागदपत्रं लागतात. इतर देशांमध्ये देखील बंदुकीच्या परवान्यासाठी इतकीच औपचारिकता करावी लागते.

(लायसन्स आणि परवानग्या यांच्याविषयीच्या कागदपत्रांची माहिती भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरुन घेण्यात आली आहे.)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.