AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Interim Budget Session : सूर्यघर योजनेअंतर्गत 300 युनिटपर्यंत वीज बील माफ, अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा काय ?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली. कुसुमाग्रजांच्या कवितेचे वाचन करून अजित पवार यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात केली. पहिल्या चार महिन्यांसाठी तरतुद करण्यासाठी हा अंतरीम अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले

Maharashtra Interim Budget Session :  सूर्यघर योजनेअंतर्गत 300 युनिटपर्यंत वीज बील माफ, अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा काय ?
| Updated on: Feb 27, 2024 | 2:43 PM
Share

मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली. कुसुमाग्रजांच्या कवितेचे वाचन करून अजित पवार यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात केली. पहिल्या चार महिन्यांसाठी तरतुद करण्यासाठी हा अंतरीम अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील 11 गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे :

–  प्रधानंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत 300 युनिटपर्यंत वीज बील माफ

– राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. राज्याला 8 हजार कोटींचा जीएसटी परतावा मिळाला.

– नगर विकास साठी 10 हजार कोटी तर सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी 19 हजार कोटी रुपये देणार

– 7 हजार 500 किमीची रस्त्याची कामे हातात घेण्यात येणार आहेत.

– राज्यात 18 वस्त्रोद्योग उभारले जाणार

– 1 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे.

– ⁠वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघर पर्यंत केला जाणार आहे.

– मिरकरवाडा बंदर नव्याने करण्यात येतं आहे.

– रत्नागिरी भागवत बंदरसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद

– हर घर हर नल योजनेअंतर्गत 1 कोटी नळ जोडणीचे उद्दिष्ट

– महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी योजना प्रस्तावित

– राज्यात सहा वंदे भारत एक्स्रेस सुरु आहेत

– मिहान प्रकल्पासाठी 10 कोटींचा निधी दिला.

– नवी मुंबई विमानतळ वर्षभरात उभे राहणार

– लघु उद्योग संकुलामधून रोजगार निर्मिती होणार

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा