AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यासाठी आनंदाची बातमी, हॉटस्पॉट जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली

सगळ्यात जास्त रुग्ण असलेल्या पुण्यात सोमवारी गेल्या 4 महिन्यातली निच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे.

राज्यासाठी आनंदाची बातमी, हॉटस्पॉट जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली
| Edited By: | Updated on: Oct 13, 2020 | 8:07 AM
Share

नागपूर : राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना सगळ्यात जास्त रुग्ण असलेल्या पुण्यात सोमवारी गेल्या 4 महिन्यातली निच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. नागपूरही कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. पण आता मात्र, आनंदाची बातमी समोर आली आहे. नागपुरात सक्रिय कोरोना बाधीतांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 12 दिवसांत उपचार घेत असलेले 40 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे परिसरात नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असं म्हणायला हरकत नाही. (Maharashtra corona update Decrease in the number of patients nagpur)

मिळालेल्या माहितीनुसार, 12 दिवसांत प्रथमच सक्रिय कोरोना रुग्णसंख्या साडेसात हजारांवर गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 76 हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 30 मृत्यू, 658 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. संसर्गाची साखळी वेगाने वाढत असताना पालिकेच्या प्रयत्नांमुळे रुग्णसंख्या घटल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्यातही कोरोनासंबंधी दिलासादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात सोमवारी कोविड-19 ची 7 हजार प्रकरणं समोर आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसांत 7,089 समोर आले असून 165 लोकांचा मृत्यू झाला आहे तर सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. (Maharashtra corona update Decrease in the number of patients nagpur)

राज्यात आज 15,656 रुग्णांचा कोविड -19 रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. महाराष्ट्रात एकूण 15 लाख 35 हजार 315 प्रकरणांची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा हा 40,514 वर गेला आहे. राज्यात आतापर्यंत 12 लाख 81 हजार 896 लोक बरे झाले आहेत. तर सध्या एकूण 2 लाख 12 हजार 439 सक्रिय प्रकरणं आहेत.

मुंबईकरांनो सावधान मुंबईत रोजच्या निदानाचा आकडा हा दोन हजारांच्या घरात असल्याचे समोर आले आहे. काही दिवसापासून हॉटस्पॉटमधील कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. मुंबईत वाढणाऱ्या निदानाला मुंबईकरांच्या चुकीच्या सवयी कारणीभूत असल्याचे मत टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी मांडले. कोविड पश्चातची जीवनशैली मुंबईकरांनी अजून स्वीकारलेली नाही. मास्क घालण्याविषयी अजूनही मुंबईकरांमध्ये गांभीर्य नाही. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटत नसल्याने रुग्ण वाढत आहेत. परिणामी, मुंबई महापालिकेने याची दखल घेऊन मास्क न घालण्याविषयीच्या दंडात वाढ करावी. पालिका असो किंवा राज्य सरकार, दोन्ही प्रशासनाकडून कडक निर्बंधांची सक्ती केली जात नाही.

इतर बातम्या –

पर्यावरणावर नुसती भाषणं देऊन काय होणार? त्यासाठी धाडसाने निर्णय घ्यावे लागतात, शिवसेनेचा फडणवीसांना टोला 

नवी मुंबईत खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 1 कोटी रुपये रुग्णांना परतवले, मनसेच्या पाठपुराव्याला यश

(Maharashtra corona update Decrease in the number of patients nagpur)

Follow Us
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा