AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दिवसभरात 3870 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 32 हजार 75 वर

राज्यात आज (21 जून) दिवसभरात कोरोनाचे 3 हजार 870 नवे रुग्ण आढळले (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 32 हजार 75 वर पोहोचली आहे.

Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दिवसभरात 3870 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 32 हजार 75 वर
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 21, 2020 | 11:57 PM
Share

मुंबई : राज्यात आज (21 जून) दिवसभरात कोरोनाचे 3 हजार 870 नवे रुग्ण आढळले (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 32 हजार 75 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 591 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आतापर्यंत 6 हजार 170 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत एकूण 65 हजार 744 रुग्ण बरे झाले आहेत. तर 60 हजार 147 रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 6 हजार 170 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज करण्यात आली आहे. तर 101 रुग्णांचा आज दिवसभरात कोरोनामुळे मृत्यू झाला.

हेही वाचा : CORONA | रेमडेसीवीर इंजेक्शनला ICMR ची परवानगी, 30 जूननंतर प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होणार : आरोग्यमंत्री

6 लाख 66 हजार 719 लोक होम क्वारंटाईन

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 7 लाख 73 हजार 865 नमुन्यांपैकी 1 लाख 32 हजार 75 नमुने पॉझिटिव्ह (17.6 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 66 हजार 719 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सध्या 26 हजार 287 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत 29 हजार 318 रुग्णांवर उपचार सुरु

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबई आतापर्यंत 66 हजार 488 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, यापैकी कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता प्रशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत 33 हजार 491 रुग्ण बरे झाले आहेतत. तर सध्या मुंबईत 29 हजार 318 रुग्णांवर उपचार सुरु आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाग्रस्त दुप्पट होण्याचा कालावधी 26 दिवसांवर

“राज्यात रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा (डबलिंग रेट) कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे 26 दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे”, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.

महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Follow Us
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!