AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CORONA | रेमडेसीवीर इंजेक्शनला ICMR ची परवानगी, 30 जूननंतर प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होणार : आरोग्यमंत्री

येत्या 30 जूननंतर रेमडेसीवीर इंजेक्शन प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करुन दिले जाणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी (Rajesh Tope On Remdesivir Injection) दिली.

CORONA | रेमडेसीवीर इंजेक्शनला ICMR ची परवानगी, 30 जूननंतर प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होणार : आरोग्यमंत्री
| Updated on: Jun 21, 2020 | 9:30 PM
Share

जालना : कोरोनावर Remdesivir हे इंजेक्शन प्रभावी मानलं जातं. रेमडेसीवीर इंजेक्शनला भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (ICMR – Indian Council of Medical Research) ने परवानगी दिली आहे. येत्या 30 जूननंतर रेमडेसीवीर इंजेक्शन प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करुन दिले जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Rajesh Tope On Remdesivir Injection Covid 19)

“रेमडेसीवीर इंजेक्शनला भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (ICMR – Indian Council of Medical Research) ने परवानगी दिली आहे. CIPLA ही औषध कंपनी हे तयार करत आहे. येत्या 30 जूननंतर रेमडेसीवीर इंजेक्शन प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच बांगलादेशपेक्षा फार स्वस्त दराने हे उपलब्ध होईल. त्यामुळे हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचवता येईल,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“नवी मुंबईतील ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने कोविड 19 च्या सौम्य लक्षण असणाऱ्यांसाठी फेविपिरावीरला फैबि फ्लू औषध शोधल्याचा दावा केला आहे. फेविपिरावीरला हे एक अँटी व्हायरल ड्रग आहे. कोरोना झाल्यानंतर लगेच चौथ्या किंवा पाचव्या दिवशी हे रुग्णाला दिलं जातं,” अशी माहिती आरोग्यमंत्री यांनी दिली.

“कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसीवीर आणि फेविपिरावीर हे दोन्ही ड्रग्स एका ठराविक दरात उपलब्ध करुन देऊ, अशी विनंती केंद्र सरकारकडे करणार आहे. तसेच गरज पडल्यास राज्य शासन खरेदी करुन त्याचा वापर करेल,” असेही राजेश टोपेंनी सांगितलं. (Rajesh Tope On Remdesivir Injection Covid 19)

काय आहे रेमडेसीवीर इंजेक्शन?

  • कोरोनावर प्रभावी मानलं जाणारं इंजेक्शन
  • WHO ने शिफारस केलेलं रेमडेसीवीर इंजेक्शन
  • एका इंजेक्शनची किंमत अंदाजे 12 हजार रुपये
  • महाराष्ट्र खरेदी करणार 10 हजार इंजेक्शन
  • तीन अन्य औषधांसोबत उपचारात वापर
  • मुळात MERS- CoV, SARS वर प्रभावी
  • हे दोन्ही आजारही विषाणूंमुळे होतात
  • अमेरिकेतील गिलीड सायन्स इंकचं उत्पादन
  • बांग्लादेशातील इस्केएफकडे उत्पादन परवाना
  • बांग्लादेशातील इस्केएफ फार्माचा प्रस्ताव
  • भारतीय कंपन्यांनीही बनवलीत तशीच इंजेक्शनं
  • अद्यापि औषध नियंत्रकांकडून मान्यता मिळालेली नाही

संबंधित बातम्या : 

Remdesivir Injection | कोरोनावर प्रभावी Remdesivir इंजेक्शन राज्य सरकार खरेदी करणार, काय आहे रेमडेसीवीर इंजेक्शन?

Corona Medicine : कोरोना रुग्णांवर उपचार करणारे औषध भारतात उपलब्ध

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.