AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Update | राज्यात दोन दिवसात 16,922 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 3 लाखांच्या दिशेला

राज्यात आज (17 जुलै) दिवसभरात कोरोनाचे तब्बल 8 हजार 308 नवे रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update).

Maharashtra Corona Update | राज्यात दोन दिवसात 16,922 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 3 लाखांच्या दिशेला
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 17, 2020 | 9:36 PM
Share

मुंबई : राज्यात आज (17 जुलै) दिवसभरात कोरोनाचे तब्बल 8 हजार 308 नवे रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 92 हजार 589 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे काल (16 जुलै) दिवसभरात राज्यात सर्वाधिक 8 हजार 614 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे दोन दिवसात 16 हजार 922 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update).

दिवसभरात 2 हजार 217 रुग्णांनी कोरोनावर मात

राज्यात आज दिवसभरात 2 हजार 217 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 लाख 60 हजार 357 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 20 हजार 480 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.81 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिवसभरात 258 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 258 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये फक्त मुंबईतील 62 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.91 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 11 हजार 452 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात 7 लाख 24 हजार 602 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 14 लाख 84 हजार 630 नमुन्यांपैकी 2 लाख 92 हजार 589 नमुने पॉझिटिव्ह (19.7 टक्के) आले आहेत. राज्यात 7 लाख 24 हजार 602 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 44 हजार 284 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात गेल्या 9 दिवसात किती रुग्ण वाढले?

  • 8 जुलै 2020 – 6 हजार 603 रुग्ण
  • 9 जुलै 2020 – 6 हजार 875 रुग्ण
  • 10 जुलै 2020 – 7 हजार 862 रुग्ण
  • 11 जुलै 2020 – 8 हजार 139 रुग्ण
  • 12 जुलै 2020 – 7 हजार 827 रुग्ण
  • 13 जुलै 2020 – 6 हजार 497 रुग्ण
  • 14 जुलै 2020 – 6 हजार 741 रुग्ण
  • 15 जुलै 2020 – 7 हजार 975 रुग्ण
  • 16 जुलै 2020 – 8 हजार 614 रुग्ण

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Follow Us
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर