Maharashtra Rain LIVE | राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा उघडला

मुंबई शहरासह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात रात्रभरापासून विजेच्या कडकडाटासह पावसाची रिपरिप सुरु आहे. (Maharashtra Rain Live Update)

Maharashtra Rain LIVE | राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा उघडला
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 1:36 PM

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई शहरासह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात रात्रभरापासून विजेच्या कडकडाटासह पावसाची रिपरिप सुरु आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण उत्तर कोकणासह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. (Maharashtra Rain Live Update)

?LIVE UPDATE?

[svt-event title=”राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा उघडला” date=”15/10/2020,1:35PM” class=”svt-cd-green” ] #कोल्हापूर – राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा उघडला, 6 आणि 3 नंबरचे दोन दरवाजे उघडले, एकूण 4 हजार क्यूसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरु [/svt-event]

[svt-event title=”पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अजित पवारांचे आदेश” date=”15/10/2020,1:08PM” class=”svt-cd-green” ] पंढरपूरच्या कुंभारघाटावरील भिंत कोसळून झालेल्या सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी- राजापुरात मुसळाधार पावसानं पूरसदृश्य परिस्थिती” date=”15/10/2020,12:08PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी- राजापुरात मुसळाधार पावसानं पूरसदृश्य परिस्थिती, अजुर्ना आणि कोदावली नद्यां धोक्याच्या पातळीवर, राजापूरच्या जवाहर चौकापर्यंत पाणी, पाणी वाढत असल्याने राजापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना, राजापूर बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”इंदापुरात शेतकऱ्याचा 12 एकरातील उभा ऊस आडवा” date=”15/10/2020,11:52AM” class=”svt-cd-green” ] इंदापूर | काल झालेल्या परतीच्या पावसामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालेल्या पाहायला मिळते बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे मिळेनासा झालाय,इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावातील भाऊसाहेब चोरमले या शेतकऱ्यांनी 12 एकरात उसाची लागवड केली होती. काल झालेल्या पावसामुळे संपूर्ण ऊस जमीनदोस्त झालेला आहे. मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालं आहे. सरकारने कुठेतरी ही नुकसान भरपाई भरून द्यावी अशी विनंती भाऊसाहेब करत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पाहणी” date=”15/10/2020,11:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात काल केवळ 4 तासात 97 मिमी पाऊस” date=”15/10/2020,11:48AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंढरपुरात द्राक्ष, डाळिंब बागा आडव्या, कोट्यवधींचं नुकसान” date=”15/10/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ] गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या कोसळधार पावसामुळे नदी नाले दुधडी भरुन वाहत असून, शेतांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्यामुळे द्राक्ष, डाळिंब तसेच खरीप पिकांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत जोरदार पाऊस” date=”15/10/2020,11:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोयना धरणाचे दरवाजे आणखी उचलले” date=”15/10/2020,8:05AM” class=”svt-cd-green” ] कराड : पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणाचे दरवाजे आणखी उचलले, कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे 3 फूट 6 इंचांनी वर उचलले, धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाण्याचा विसर्ग वाढवला [/svt-event]

[svt-event title=”पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या ” date=”15/10/2020,8:03AM” class=”svt-cd-green” ] अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज 15 आक्टोबरला होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. याचे सुधारित वेळापत्रकनंतर जाहीर करण्यात येईल, विद्यापीठ प्रशासनाची माहिती  [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात रात्रभर तुफान पाऊस, रस्त्यांवर पाणी साचले” date=”15/10/2020,8:01AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

मुंबईत ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह पाऊस

मुंबईसह उपनगरात रात्री 9 नंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री 11 वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. मध्यरात्रीनंतर उत्तर कोकणातील जवळपास सर्वच परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यामुळे सर्वांचीच झोप उडाली.

मुंबईत 14 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत पहाटे 2.30 पर्यंत कुलाबा वेधशाळेने 83 मिमी तर सांताक्रुझ वेधशाळेत 66 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सॅटेलाइट आणि रडारने टिपलेले ताजे दृष्य लक्षात घेता उत्तर कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र त्यानंतर हवामान विभागाने मुंबई व ठाण्यासह संपर्ण उत्तर कोकणसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे ट्विट भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी केले आहे.

पुण्यातील रस्ते पाण्यात

पुण्यात परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कांत्रज कोंढवा रस्त्यावर पावसाचे पाणी साचले.  कात्रज स्मशानभूमी जवळच्या नाल्यात रिक्षा वाहून गेली. तर उड्डाणपुलावरुन पाणी वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

पुण्यात नागरिकांच्या घरातच नाही तर पोलीस ठाण्यातही पाणी शिरलं. चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

पुणे शहरातील बहुतेक भागातील पावसाचा जोर ओसरत असून ठिकठिकाणी साचलेलं पाणी ओसरायला मात्र आणखी काही कालावधी लागणार आहे. यासाठी आपल्या पुणे महापालिकेची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. सुरक्षित ठिकाणी थांबा, घराबाहेर पडू नका, असे ट्वीट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

रत्नागिरीत दमदार पाऊस

समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रत्नागिरीत रात्रीपासून पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळत आहेत. किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम आहे. सध्या किनारपट्टीभागात वेगवान वारे पहायला मिळत आहेत. किनारी भागात 35 ते 40 किमी वेगानी वारे वाहत आहेत.

रत्नागिरीत रात्रीपासून सुरु झालेला पाऊस अद्याप थांबलेला नाही. सध्या मच्छीमारी सुद्धा ठप्प झाली आहे. मच्छिमारांनी समुद्रात जावू नये असा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर असाच वाढणार आहे, त्यामुळे समुद्रकिनारपट्टीमधील नागरिकांनी सतर्क राहा, असा इशारा प्रशासनानं दिला आहे.

साताऱ्यातील धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली 

सातारा जिल्हयात रात्रभर मुसळधार पडलेल्या पावसामुळे सातारा, माण, खटाव, फलटण, वाई, जावली, महाबळेश्वर तालुक्यांमध्ये नदी, नाले, तलाव भरुन वाहू लागले आहेत. सातारा येथील धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यामुळे वीर, उरमोडी, कण्हेर, धोम धरणातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात रात्रीपासून करण्यात आला आहे.

यामध्ये वीर धरणातून रात्री 23 हजार 185 क्युसेक, उरमोडी धरणातून रात्री 1900 क्युसेक तर कण्हेर धरणातील दोन वक्रदरवाजातुन रात्री 1750 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे सर्व धरणा लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. माण-खटाव तालुक्यातील या पावसामुळे बंधारे भरुन वाहू लागले आहेत

संबंधित बातम्या : 

Maharashtra Rain | पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार, बारामती शहरात पावसामुळे नागरिक रस्त्यावर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठा अपघात, टँकरनं धडक दिल्यानं गाडी थेट दरीत

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.