एकाच दिवसात 116 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सहा दिवसात चारशेहून अधिक पोलिसांना लागण

| Updated on: May 29, 2020 | 12:59 PM

आतापर्यंत एकूण 249 पोलीस अधिकाऱ्यांना आणि 1962 कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले आहे. (Maharashtra Police Corona Positive)

एकाच दिवसात 116 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सहा दिवसात चारशेहून अधिक पोलिसांना लागण
Follow us on

मुंबई : राज्य पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. आजच्या दिवसात (29 मे) तब्बल 116 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत एकूण 2211 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कालच्या दिवसात महाराष्ट्र पोलीस दलातील 131 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला होता. गेल्या सहा दिवसात चारशेहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. (Maharashtra Police Corona Positive)

आतापर्यंत एकूण 249 पोलीस अधिकाऱ्यांना आणि 1962 कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले आहे. कोरोनाची लक्षणं असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. 165 अधिकारी आणि 1051 कर्मचारी अशा एकूण 1216 पोलिसात ही लक्षणं दिसून येत आहेत. कालच्या दिवसात तीन कोरोनाग्रस्त पोलिसांना प्राण गमवावे लागले. आतापर्यंत 25 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तारीख – एका दिवसात लागण झालेले पोलीस

28 मे – 131
27 मे – 75
26 मे – 80
25 मे – 51
24 मे – 87

एका दिवसात 73 पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत, ही त्यात दिलासादायक बाब. 83 अधिकारी आणि 887 पोलीस कर्मचारी असे एकूण 970 जण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत.

संचारबंदीच्या काळात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांवर 254 ठिकाणी हल्ले झाले असून या प्रकरणी 833 हल्लेखोर नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नागरिकांच्या हल्ल्यात एकूण 86 पोलीस जखमी झाले आहेत. (Maharashtra Police Corona Positive)

राज्यभरात संचारबंदीच्या काळात कोविड संदर्भात एक लाख 18 हजार 488 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 23 हजार 511 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 76,076 वाहनं जप्त करण्यात आली आहेत.

राज्यभरात पोलिसांनी हातावर क्वारंटाईन असा शिक्का असलेल्या 706 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवलं आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या 1323 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कालावधीत आरोपींकडून पाच कोटी 79 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यभरात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सेवकांवर हल्ल्याच्या 41 घटना घडल्या आहेत.