महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजार पार, 24 तासात 221 पोलीस पॉझिटिव्ह

| Updated on: May 11, 2020 | 11:23 AM

महाराष्ट्र पोलीस दलाला कोरोनाने विळखा घातला असून गेल्या 24 तासात (Maharashtra Police Corona Virus Cases) तब्बल 221 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजार पार, 24 तासात  221 पोलीस पॉझिटिव्ह
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाला कोरोनाने विळखा घातला आहे. गेल्या 24 तासात तब्बल 221 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजारच्या वर पोहोचला आहे. (Maharashtra Police Corona Virus Cases)

महाराष्ट्र पोलीस विभागातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून आज (11 मे) सर्वाधिक 221 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 786 वरुन 1 हजार 007 वर पोहोचला आहे.

पोलिसांना कोरोनाचा विळखा

  • सोमवार 11 मे – 221
  • रविवार 10 मे – 72
  • शनिवार 9 मे – 96
  • शुक्रवार 8 मे – 87
  • गुरुवार 7 मे – 36
  • बुधवार 6 मे – 38

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात गेल्या सहा दिवसात जवळपास 550 पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर दुर्देवाने आतापर्यंत 7 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईतील 3पुणे 1सोलापूर 1 अशा 5 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला.

सुदैवाने यातील 13 अधिकारी आणि 63 पोलीस कर्मचारी असे एकूण 76 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान जर पोलिसांना कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेतयाकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. 

(Maharashtra Police Corona Virus Cases)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्र पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, पाच दिवसात 329 पोलिसांना संसर्ग

पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी