शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे निकाल अडचणीत, मुख्याध्यापक, शिक्षक परगावी

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. या दरम्यान सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालयेही बंद केली (Maharashtra School Student Result) आहेत.

शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे निकाल अडचणीत, मुख्याध्यापक, शिक्षक परगावी

पुणे : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. या दरम्यान सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालयेही बंद केली (Maharashtra School Student Result) आहेत. त्यामुळे पहिले ते नववी आणि अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. या विद्यार्थ्यांना आधीचे सरासरी मार्क लक्षात घेऊन गुण देण्यात येणार आहेत. पण आता मुख्याध्यापक, शिक्षक परगावी असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे निकाल कळवणे सध्या अडचणीचे झाले (Maharashtra School Student Result) आहे.

लॉकडाऊन घोषित केल्यानंतर अनेक जण आपले शहर सोडून नातेवाईक किंवा गावाकडे गेले आहेत. यामध्ये शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकही परगावी गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लावणे आता अशक्य झाले आहे.

पहिली ते नववी आणि अकरावीचे निकाल कळवण्याचे आदेश राज्य माध्यमिक शिक्षण संचालकांनी शाळा आणि महाविद्यालयांना दिले आहेत. दूरध्वनी, एसएमएस किंवा ऑनलाईन पद्धतीने निकाल कळवा, असंही सांगण्यात आलं आहे.

लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळ शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकही परगावी गेलेत. या दरम्यान आता निकाल कळवणे अशक्य आहेत. माध्यमिक शिक्षण संचालकांनी काढलेल्या या आदेशाला मुख्याध्यापक संघटनेने विरोध केला आहे.

काहीदिवसांपूर्वीच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द केला होता. यासोबतच नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द केल्या होत्या. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत संबंधित विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावी आणि बारावीला प्रवेश मिळणार आहे.

दरम्यान, पुढील शैक्षणिक वर्षाचे शाळांचे वर्ग सुरु झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने फी मागू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षणमंत्र्यांनी शाळांना दिल्या आहेत. लॉकडाऊन काळात देशातील अनेक शाळांनी पालकांना फी शुल्क भरण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पालकांनी यासंदर्भात सरकारकडे तक्रार केली. त्यानंतर सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लॉकडाऊन काळात पालकांकडून फी न आकारण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित बातम्या :

राज्यातील शाळांची फी वाढ थांबवा, आशिष शेलारांचं शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र

कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणारच, उच्च-तंत्रशिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI