AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात मान्सून परतीच्या मार्गावर, ‘या’ जिल्ह्यांमध्ये हलका ते मुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक राज्यांमध्ये आज वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

राज्यात मान्सून परतीच्या मार्गावर, 'या' जिल्ह्यांमध्ये हलका ते मुसळधार पावसाची शक्यता
| Edited By: | Updated on: Oct 22, 2020 | 9:14 AM
Share

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे देशभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा आला होता. पण आता तो दूर झाला असून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 22 आणि 23 ऑक्टोबरला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. (Maharashtra weather update 22 October weather forecast light rain in kokan madhya Maharashtra)

भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक राज्यांमध्ये आज वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावेल. किनारपट्टी भागातही मुसळधार पाऊस कोसळेल असं हवामान खात्याने म्हटलं आहे. खरंतर, मागच्या महिन्यापासून सलग 3 वेळा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्यामुळे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली.

लग्नाची मागणी घालण्यासाठी येणाऱ्या तरुणाने लुटलं, तरुणीला तब्बल साडेसहा लाखांचा गंडा

या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारीपट्टी भागात 22 ऑक्टोबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 23 ऑक्टोबरला नागालँड, मानपूर, मिझोरम आणि त्रिपुरा तर 24 ऑक्टोबरला आसाम आणि मेघालयात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात हाहाकार खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरु असताना झालेल्या पावसामुळं कोकण, पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भात नुकसान झाले आहे. सोयाबीन, भात, कापूस, ऊस, हळद, तूर आदी पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनानं आणि पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

देवीच्या मंदिरातील भुस्खलनाचा थरारक CCTV, 5 भक्त ढिगाऱ्याखाली अडकले

अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकाची लागवड केली. मात्र या नासाडीमुळे शेतासाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना अतिवृष्टीचे संकट आल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे.

(Maharashtra weather update 22 October weather forecast light rain in kokan madhya Maharashtra)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.