Lockdown 2 : पुणे-पिंपरी, सोलापूर सील, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात संचारबंदी

| Updated on: Apr 20, 2020 | 11:31 AM

कोरोनाचा वाढता कहर पाहता, अनेक महापालिकांनी आजपासून शहरं संपूर्ण सील (Maharashtra Pune Solapur Thane seal) करण्याचा निर्णय घेतला आहे.

Lockdown 2 : पुणे-पिंपरी, सोलापूर सील, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात संचारबंदी
Follow us on

मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये आर्थिक चक्र चालू ठेवण्यासाठी उद्योगांना अंशत: दिलासा (Maharashtra Pune Solapur Thane seal) दिला आहे. मात्र कोरोनाचा वाढता कहर पाहता, अनेक महापालिकांनी आजपासून शहरं संपूर्ण सील (Maharashtra Pune Solapur Thane seal) करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेने रविवारी रात्री 12 वाजल्यापासून ते पुढील 7 दिवस संपूर्ण शहर सील केलं आहे. त्यापाठोपाठ सोलापूर महापालिकेनेही आज दुपारपासून म्हणजे 20 ते 23 एप्रिलपर्यंत शहर सील करण्याचा निर्णय घेतला.

इकडे ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका क्षेत्र, नगरपंचायत, ठाणे ग्रामीण संपूर्ण सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर शहर सील
सोलापूर शहरात आजपासून 23 एप्रिलपर्यंत संपूर्ण संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे. सोलापुरातील सर्व प्रकारच्या आस्थापन आणि हद्दी बंद राहतील. मात्र दूधवाटप तसेच औषध दुकाने ,हॉस्पिटल वगळता सर्व आस्थापना चार दिवस बंद राहणार आहेत.

आज दुपारी 2 वाजल्यापासून 23 एप्रिलपर्यंत संपूर्ण संचारबंदी राहणार आहे. यातून आरोग्य, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता त्याचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी कडक करण्यात आली आहे.

पुण्यात कर्फ्यू

पुण्यात मध्यरात्री बारा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्र सील करण्यात आले आहे. पुढील सात दिवस म्हणजे 27 एप्रिल 2020 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही व्यक्तींना पुणे शहर आणि इतर परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कर्फ्यू

तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरही कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. काल मध्यरात्रीपासून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांनाही ठराविक वेळ ठरवून दिला आहे. येत्या 27 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

कोणकोणती शहरं संपूर्ण सील?

  • पुणे – 19 एप्रिल मध्यरात्रीपासून 27 एप्रिलपर्यंत
  • पिंपरी चिंचवड – 19 एप्रिल मध्यरात्रीपासून 27 एप्रिलपर्यंत
  • सोलापूर – 20 एप्रिल दुपारी 2 पासून 23 एप्रिल रात्री 12 पर्यंत
  • ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्र
  • नवी मुंबई महापालिका क्षेत्र
  • कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र
  • मीरा भाईंदर महापालिका क्षेत्र
  • उल्हासनगर महापालिका क्षेत्र
  • भिवंडी महापालिका क्षेत्र
  • अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्र
  • बदलापूर नगरपरिषद क्षेत्र
  • शहापूर नगरपंचायत
  • मुरबाड नगरपंचायत
  • ठाणे जिल्हा परिषदेचे संपूर्ण क्षेत्र

संबंधित बातम्या 

मध्यरात्रीपासून पुणे शहर पूर्णपणे सील, महापालिका आयुक्तांचे आदेश