मी मेल्यावर तरी राज्य-केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल, बीडच्या विवेकची सुसाईड नोट

| Updated on: Oct 01, 2020 | 12:24 PM

मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीने पुढील शिक्षणाच्या चिंतेपायी बीडच्या केतूरा गावातील एका अठरा वर्षीय युवकाने आत्महत्या केलीय (Maratha Youth suicide on Mararha reservation in Beed).

मी मेल्यावर तरी राज्य-केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल, बीडच्या विवेकची सुसाईड नोट
Follow us on

बीड : मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीने पुढील शिक्षणाच्या चिंतेपायी बीडच्या केतूरा गावातील एका अठरा वर्षीय युवकाने आत्महत्या केलीय (Maratha Youth suicide on Mararha reservation in Beed). विवेक राहाडे असं या तरुणाचं नाव आहे. त्याने नुकतीच नीटची परीक्षा दिली होती. घटनास्थळावर एक सुसाईड नोट मिळाली आहे. यात त्याने मराठा आरक्षणावरील स्थगितीमुळे वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश मिळणार नाही याच चिंतेतून त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे.

विवेक राहाडे याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे, “मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मी नुकतीच नीट (NEET) ही मेडिकलची परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्यामुळे माझा नीटमध्ये नंबर लागला नाही. प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकवण्याची माझ्या घरच्यांची ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची किव येईल आणि माझे मरण सार्थक होईल.”

या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस आत्महत्याच्या इतर बाजूही तपासत असून कारणांचा शोध घेत आहेत. दरम्यान केतुरा गावात स्मशान शांतता पसरली आहे. राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक केतुरा येथे येत आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही केतुरा येथे येऊन विवेक याच्या कुटुंबाचे सांत्वन केले. मुलाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने आईचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीत. सरकार असे आणखी किती विवेकने बळी घ्यायची वाट पाहणार आहे? असा संतप्त सवाल पीडित कुटुंब विचारत आहे.

विवेक राहाडे आत्महत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील केतुरा गावात विषण्ण वातावरण आहे. वातावरण बिघडू नये म्हणून केतुरा गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडूनही विवेक राहाडे या तरुणाच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

“लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं”, मराठा आरक्षणावर संभाजीराजेंचं युवकांना आत्महत्या न करण्याचं आवाहन

मराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार मैदानात; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार!

व्हिडीओ पाहा :

Maratha Youth suicide on Mararha reservation in Beed