भर पावसात गाडीतून हिसकावलेला मोबाईल शोधला, भारत गणेशपुरेंना सुखद धक्का, मुंबई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

| Updated on: Sep 08, 2020 | 10:32 PM

कोरोना काळात मुंबई पोलिसांनी झोन ​​12 च्या हद्दीत मराठी अभिनेता भारत गणेशपुरी यांच्यासह 312 जणांचा मोबाईल चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

भर पावसात गाडीतून हिसकावलेला मोबाईल शोधला, भारत गणेशपुरेंना सुखद धक्का, मुंबई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
Follow us on

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरेचा चोरी गेलेला मोबाईल मुंबई पोलिसांनी परत केला आहे (Bharat Ganeshpure Stolen Mobile Phone Returned). कोरोना काळात मुंबई पोलिसांनी झोन ​​12 च्या हद्दीत मराठी अभिनेता भारत गणेशपुरे यांच्यासह 312 जणांचा मोबाईल चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे (Bharat Ganeshpure Stolen Mobile Phone Returned).

या मोबाईल चोरांना पकडण्यासाठी सर्कल 12 चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोरीचा मोबाईल शोधण्यासाठी आणि चोरट्यांसमवेत मोबाईल जप्त करण्यासाठी एक विशेष पथक तयार केले आहे.

अभिनेता भरत गणेशपुरे यांनी मोबाईल चोरल्याची तक्रार समतानगर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत झोन 12 डीसीपी डॉ. डी. स्वामी यांनी भारत गणेशपुरेसह 312 जणांचे चोरी गेलेले मोबाईल परत केले आहेत.

भर पावसात, ट्रॅफिकमध्ये एका टोळीने भारत गणेशपुरेचा मोबाईल चोरला

महिन्याभरापूर्वी भारत गणेशपुरेचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेला होता. त्याबाबत गणेशपुरेने सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्यासोबत घडलेला थरारक प्रसंग सांगितला होता. भर पावसात, ट्रॅफिक झालेली असताना एका टोळीने मदतीचं नाटक करत त्यांचा मोबाईल चोरला होता. त्यांनी आपले अनुभव सांगणारा व्हिडीओ फेसबूकवर पोस्ट केला होता.

Bharat Ganeshpure Stolen Mobile Phone Returned

संबंधित बातम्या :

कंगनाची चौफेर कोंडी, विधानसभेत हक्कभंग, ड्रग्ज प्रकरणातही चौकशी होणार

Rhea Chakraborty Arrest | रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक