ऑनलाईन पे करुनही मसाजसाठी तरुणी आली नाही, नागपूरच्या तरुणाची पोलिसात तक्रार

| Updated on: Mar 02, 2020 | 11:52 PM

थकवा घालवण्यासाठी ऑनलाईन मसाजगर्ल बोलवण्याचा तुम्ही विचार करत असाल तर थोडं (Massage Girl fraud nagpur) थांबा.

ऑनलाईन पे करुनही मसाजसाठी तरुणी आली नाही, नागपूरच्या तरुणाची पोलिसात तक्रार
Follow us on

नागपूर : तुम्ही घरात एकटे आहात, थकवा जाणवतोय आणि थकवा घालवण्यासाठी ऑनलाईन मसाजगर्ल बोलवण्याचा तुम्ही विचार करत असाल तर थोडं (Massage Girl fraud nagpur) थांबा. कारण नागपुरात एका तरुणाला अशाचप्रकारे मसाज करण्याची हौस चांगलीच महागात पडली आहे. नागपूरच्या एका तरुणाची मसाजगर्लकडून फसवणूक झाल्याचा प्रकार नुकतंच उघडकीस आला आहे. याविरोधात त्या तरुणाने पोलिसात तक्रार केली (Massage Girl fraud nagpur) आहे.

नागपूरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार समोर आला आहे. घनवट नावाच्या एका तरुणाने मसाज करण्यासाठी घरी मसाजगर्ल बोलवली. यासाठी त्याने परी नाईट.कॉम-एस्कॉर्ट सर्व्हिसवरुन एका तरुणीचा फोटो निवडला. वेबसाईटवर दिलेल्या मोबाईल नंबरवरुन त्या तरुणाने तिला फोन केला. तिने त्या तरुणाला तासाभरात येण्याचे सांगत बुकिंग चार्ज म्हणून अॅडव्हान्स 3 हजार रुपये मागितले. त्या तरुणाने लगेच मोबाईल क्रमांकावरुन तिच्या खात्यात गुगल पे द्वारे 3 हजार रुपये ट्रान्सफर केले.

पण बराच वेळ झाल्यानंतरही ती तरुणी आली नाही. त्यामुळे त्या तरुणाने तिच्या मोबाईलवर संपर्क केला. त्यावेळी त्या तरुणीने “तू घरी आल्यावर माझ्याशी अश्‍लील चाळे करशील, ही भीती आहे. त्यामुळे तू “रिस्क अमाऊंट’ म्हणून आणखी 2 हजार रुपये गुगल पे कर”, अशी मागणी केली.

तिच्या या मागणीनंतर त्या तरुणाला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. यानंतर त्याने मसाज गर्लविरोधात गिट्टीखदान पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि सायबर ॲक्टखाली मसाजगर्लवर गुन्हा दाखल केला. या तक्रारीनंतर पोलीस त्या मसाजगर्लचा शोध घेत (Massage Girl fraud nagpur) आहेत.