ग्रेटर नोएडामधून मोठी बातमी, Oppo मोबाइल कंपनीच्या वेअर हाऊसमध्ये भीषण आग

आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

ग्रेटर नोएडामधून मोठी बातमी, Oppo मोबाइल कंपनीच्या वेअर हाऊसमध्ये भीषण आग
| Edited By: | Updated on: Nov 28, 2020 | 11:09 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडा (Greater Noida) इथं शनिवारी सायंकाळी मोठा अपघात झाला आहे. इथं OPPO मोबाइल कंपनीच्या (Mobile Company) गोदामात भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच कंपनीच्या आत माहिती पसरली आणि कर्मचाऱ्यांनी कंपनीबाहेर धाव घेतली. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या आगीमुळे कोट्यवधींचं नुकसान झालं असल्याची माहिती देण्यात आली आहे. (massive fire in oppo mobile company at greater noida delhi)

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना इकोटेक फर्स्ट पोलीस स्टेशन परिसरातील असून अद्याप आगीचं खरं कारण समोर आलेलं नाही. ग्रेटर नोएडामध्ये ओप्पो मोबाइलचा सर्वात मोठं प्लांट आहे जिथे ही आग लागली आहे. मोबाईल कंपनीतील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. तब्बल चार तासाच्या अथक परिश्रमानंतर 15 वाहनांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.

इतकंच नाही तर या आगीमुळे कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. कंपनीच्या कर्मचार्‍यांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला आणि पोलीस विभागाला दिली आहे. आज संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खरंतर, इकोटेक -1 इथं असलेल्या अग्निशमन विभागाला अचानक ओपीपीओ मोबाइल कंपनीला आग लागल्याची माहिती मिळाली. (massive fire in oppo mobile company at greater noida delhi)

माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दाखल झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आग पसून कंपनीचं नुकसान झालं.

इतर बातम्या – 

गुजरातमध्ये COVID रुग्णालयाला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू

साकीनाक्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, भीषण आगीत 5 होरपळले, एका मुलीचा मृत्यू

(massive fire in oppo mobile company at greater noida delhi)