मानखुर्द झोपडपट्टीमधील भीषण आग आटोक्यात, अग्निशमन दलाच्या प्रयत्नांना यश

स्थानिकांच्या आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:10 PM, 23 Nov 2020

मुंबई : मानखुर्द (Mankhurd ) पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज पीएनजी कॉलनी चिकूवाडी इथं मनुष्य वस्ती असलेल्या झोपडपट्टीला मोठ्या प्रमाणात आग (massive fire) लागली होती. स्थानिकांच्या आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुपारी 03.00 वा. दरम्यान लाग लागली असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांकडून देण्यात आली आहे. (massive fire was contained in Mankhurd slum 3 bombs of fire brigade on spot)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच तात्काळ सदर ठिकाणी पोलीस, दिवस पाळी पर्यवेक्षक निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व पथक, गुंडा पथक, तसेच गस्तीवरील मोबाइल योग्य मनुष्यबळासह घटनास्थळी पोहोचले. याचवेळी अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली.

अधिका माहितीनुसार, घटनास्थळी कोणतीही मनुष्य हानी झालेली नसून नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं आहे. तर या भीषण आगीमध्ये आठ ते दहा झोपड्या जळाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीचे प्राथमिक कारण शॉर्टसर्किट असबन सदर बाबत सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने तातडीने वस्तीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं. या भीषण आगीचा एक व्हीडिओदेखील समोर आला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ परिसरात पसरले होते. यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या संपूर्ण आग विझवण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या –

Mumbai Corona | मुंबई महापालिका कोरोना संसर्गाविरुद्ध अ‌ॅक्शन मोडमध्ये, मिशन धारावी सुरु

मुंबई लोकल सुरु करण्याबाबत वेट अँड वॉच भूमिका, परिस्थिती पाहून निर्णय घेऊ : पालिका आयुक्त

(massive fire was contained in Mankhurd slum 3 bombs of fire brigade on spot)