AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई लोकल सुरु करण्याबाबत वेट अँड वॉच भूमिका, परिस्थिती पाहून निर्णय घेऊ : पालिका आयुक्त

पालिका प्रशासन आणि राज्य सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे. (BMC Commissioner Iqbal Chahal On Mumbai Local Restart)

मुंबई लोकल सुरु करण्याबाबत वेट अँड वॉच भूमिका, परिस्थिती पाहून निर्णय घेऊ : पालिका आयुक्त
| Updated on: Nov 23, 2020 | 3:32 PM
Share

मुंबई : मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यावरुन तर्क-वितर्क सुरु आहेत. दिवाळीनंतर मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करावी की नाही याबाबत विचारविनिमय सुरु आहेत. मात्र मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहून लोकलचा निर्णय होईल, असे वक्तव्य मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केले आहे. (BMC Commissioner Iqbal Chahal On Mumbai Local Restart)

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिस्थिती पाहूनच मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यावर निर्णय घेतला जाईल. पुढील एक किंवा दोन आठवडे मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. यानंतर लोकल सुरु करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली.

मुंबई महापालिका आयुक्तांच्या या वक्तव्यानुसार सध्या तरी पालिका प्रशासन आणि राज्य सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे.

मुंबईसाठी पुढील तीन ते चार आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. सध्या तरी, मुंबईत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आलेले नाही. तीन ते चार आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर निर्बंध लागू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तर दुसरीकडे कोरोनाचा वाढता आकडा पाहता मुंबईतील सर्व शाळा मात्र 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण

16 नोव्हेंबर – 409 17 नोव्हेंबर – 541 18 नोव्हेंबर – 871 19 नोव्हेंबर – 924 20 नोव्हेंबर – 1031 21 नोव्हेंबर – 1092 22 नोव्हेंबर – 1135

(BMC Commissioner Iqbal Chahal On Mumbai Local Restart)

संबंधित बातम्या : 

मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी उपाययोजना

Mumbai Corona | मुंबईत कोरोनाचा चढता क्रम, पाच दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....