मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी उपाययोजना

मुंबईत दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे पालिकेने उपाययोजनांची तयारी केली आहे. (BMC On Alert Mode After Corona Patient Increasing)

मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी उपाययोजना

मुंबई : राज्यात हिवाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढतील अस बोललं जातं होते. नुकतंच राजधानी दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आलेली पाहायला मिळत आहे. तर मुंबईत सुद्धा दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे मुंबईतील रुग्ण संख्या आता हळूहळू वाढायला लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. (BMC On Alert Mode After Corona Patient Increasing)

मुंबईत एप्रिल महिन्यात कोरोनाने शिरकाव केला. सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण कमी होते. मात्र नंतर गणपतीपर्यंत मुंबईत कोरोनाचे रुग्ण हे दोन हजार पार गेले होते. यावेळी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना आखल्या. कोविड सेंटर उभारले. त्रिसूत्री कार्यक्रम आखले. या सर्व उपाययोजनानंतर कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली.

पण आता मात्र मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने काही उपाययोजनांची तयारी सुरु केली आहे.

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली तर उपायोजना काय? 

 • रुग्णालय आणि कोरोना सेंटरमधील बेड तयार आहेत.
 • ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तयार ठेवण्यात आले आहेत.
 • 70 हजार बेड पैकी 20 हजार बेड गंभीर रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
 • सध्या 58 कोविड सेंटर कार्यरत आहेत. त्यापैकी 10 टक्के बेड भरले आहेत.
 • तर 35 सेंटर असे आहेत जे 2 दिवसाच्या नोटीसवर सुरु करता येतील
 • तर 400 सेंटर असे आहेत जे 8 दिवसांच्या नोटीसवर सुरू करता येतील.
 • गरज पडल्यास राखीव कोविड सेंटर टप्प्याटप्याने सुरु करता येतील.
 • औषधांसह इंजेक्शनचा पुरेसा साठा आहे.
 • सर्व ठिकाणी आधी सिलेंडर द्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात होता. मात्र आता टर्बो फॅसिलिटी द्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेतली गेली आहे.
 • सर्व जम्बो फॅसिलीटी सेंटर मध्ये ओपिडी सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये तपासणी करतानाच कोरोनाच्या चाचण्या करून पॉझिटिव्ह रुग्णांना अॅडमिट करून उपचार केले जाणार आहेत. (BMC On Alert Mode After Corona Patient Increasing)
 • पालिकेच्या सर्व दवाखान्यात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान मार्च महिन्यातला सर्वात कमी कोरोना पॉझिटिव्हीटी रेट हा दिवाळीनंतर पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी 11 नोव्हेंबरला चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 7.83 टक्के होतं. मात्र दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाधित रुग्णांचं प्रमाण 10.63 टक्क्यांवर गेलं

तसेच दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 19 नोव्हेंबरला दिवाळीनंतर मार्च महिन्यापासून आतापर्यंतच्या सर्वाधिक 17260 कोविड चाचण्या झाल्या आहेत. त्यात 1018 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले

मुंबईतील नागरिकांशी तुलनेने अधिक संपर्क येणाऱ्या व्यावसायिकांची कोविड वैद्यकीय चाचणी करुन घेण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत विविध दुकानदार, दुकानात-हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी, बेस्टचे चालक-वाहक इत्यादींची कोविड चाचणी नियमितपणे करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता दुसरी लाट येण्याआधी ती परतून लावण्याची तयारी सुरू केली आहे.(BMC On Alert Mode After Corona Patient Increasing)

संबंधित बातम्या : 

दिवाळीनंतर मुंबईत रुग्णसंख्या घटली, पण दिल्लीची अवस्था पाहता महापालिका अलर्ट मोडवर

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, मुंबईकरांनो सावधान, पालिका आयुक्तांचे आवाहन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *