कोरोना संकटात घरखरेदी अधिक सुलभ, MCHI चे ऑनलाइन पोर्टल

| Updated on: Nov 05, 2020 | 6:34 PM

या पोर्टलचा ऑनलाईन शुभारंभ 9 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कोरोना संकटात घरखरेदी अधिक सुलभ, MCHI चे ऑनलाइन पोर्टल
Follow us on

ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी प्रादूर्भाव कमी झालेला नाही. गर्दी टाळण्याच्या उद्देशोने एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्यावतीने घर खरेदी करण्याकरीता ग्राहकांसाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आलं आहे अशी माहिती एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी दिली आहे. या पोर्टलचा ऑनलाईन शुभारंभ 9 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. (MCHI has created an online portal Buying home should be easy in Corona crisis)

या शुभारंभ प्रसंगी महापौर विनीता राणे यांच्यासह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत. एमसीएचआयचे हे दहावे प्रॉपर्टी प्रदर्शन आहे. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे. या पोर्टलद्वारे ग्राहक ऑनलाईन घर घरेदी करू शकतात. या ऑनलाईन पोर्टलवर 100 बिल्डरांच्या 150 पेक्षा जास्त गृह प्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे.

नवे प्रकल्प आणि घर खरेदीवरील सूट याची माहिती पोर्टलवर आहे. सरकारने स्टॅम्प ड्यूटी आणि गृह कर्जावरील व्याजात कपात केल्याने घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. घर खरेदी मागील दोन महिन्यात 50 टक्केने वाढली आहे. एमएमआर रिजनमध्ये 13 हजार 500 घरं विकली गेली आहे.

कोरोना काळात सोशल डिस्टसिंगचं पालन करत ग्राहक घरच्या घरीच एका क्लिकवर घर बुक करू शकतो. या पोर्टलद्वारे 18 नोव्हेंबर्पयत घर खरेदी करता येऊ शकते.

इतर बातम्या – 

कल्याणमध्ये दोन गटांत हाणामारीदरम्यान अ‍ॅसिड हल्ला, सहाजण गंभीर जखमी

अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सुजय‌ विखेंचं पंतप्रधान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह बड्या नेत्यांना दिवाळी गिफ्ट, खास ‘साई ब्लेसिंग बॉक्स’ पाठवला

(MCHI has created an online portal Buying home should be easy in Corona crisis)