दाढी असलेल्या पुरुषांचं महिलांना आकर्षण!

मुंबई : सध्या तरूणांमध्ये दाढी वाढवण्याची मोठी क्रेझ आहे. कुणी बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या फ्रेंच कटची कॉपी करतं, तर कुणी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ठेवलेल्या दाढीची. एकंदरीत दाढी वाढवणं किंवा दाढी कोरणं ही फॅशनच झाली आहे. आता दाढी वाढवणाऱ्यांसाठी खास बातमी आहे. दाढी ठेवणारे पुरुष महिलांना जास्त आकर्षित आणि आवडतात. ‘जर्नल ऑफ […]

दाढी असलेल्या पुरुषांचं महिलांना आकर्षण!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई : सध्या तरूणांमध्ये दाढी वाढवण्याची मोठी क्रेझ आहे. कुणी बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या फ्रेंच कटची कॉपी करतं, तर कुणी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ठेवलेल्या दाढीची. एकंदरीत दाढी वाढवणं किंवा दाढी कोरणं ही फॅशनच झाली आहे. आता दाढी वाढवणाऱ्यांसाठी खास बातमी आहे.

दाढी ठेवणारे पुरुष महिलांना जास्त आकर्षित आणि आवडतात. ‘जर्नल ऑफ एव्हॉल्युशनरी बायोलॉजी’ने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. जवळपास 8500 महिलांना प्रश्न विचारुन सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला.

या सर्वेक्षणात पुरुषांचे काही फोटो काढण्यात आले होते. या फोटोंमध्ये क्लिन दाढी असलेला चेहरा, 5 दिवसांची दाढी वाढलेला चेहरा, 10  दिवसांची दाढी असलेला चेहरा आणि महिनाभर दाढी वाढलेला चेहरा यांचा समावेश होता.

या फोटोंपैकी कोणत्या पुरुषाला बॉयफ्रेंड करणं आवडेल, असा प्रश्न विचारल्यानंतर या 8500 महिलांपैकी अर्ध्यांहून अधिक महिलांनी दाढी वाढवणाऱ्या पुरुषांना पसंती दिली.

तसेच, या सर्वेक्षणात आणखी एक बाब समोर आली की, महिलांना पुरुषांच्या चेहऱ्याचा आकार देखील आकर्षित करतो. पुरुषांनी दाढी वाढवणं हे पुरुषत्वचं लक्षण आहे असा महिलांचा समज आहे.