राज्यात सर्व सुरु करण्याचा निर्णय विचार करुनच : छगन भुजबळ

| Updated on: Oct 10, 2020 | 3:44 PM

उद्यापासून 2000 सिलेंडर रोज मिळतील, अशी व्यवस्था केली आहे, असेही भुजबळांनी सांगितले. (Chhagan Bhujbal On Maharashtra Unlock)

राज्यात सर्व सुरु करण्याचा निर्णय विचार करुनच : छगन भुजबळ
Follow us on

नाशिक : “राज्यात नवरात्रौत्सवादरम्यान सर्व उत्सव साजरा करण्यास बंदी घातली आहे. यंदा गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रीदरम्यान नियम लागू होतील. सध्या लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे. तसेच कावडीवाल्यांनी देखील गडावर येऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. राज्यात हळूहळू सगळं खूलं करायचं आहे. पण सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला जाईल,” असेही भुजबळ म्हणाले. (Chhagan Bhujbal On Maharashtra Unlock)

“नाशिकमध्ये अॅक्टिव्ह रुगणांची संख्या 761 ने कमी झाली आहे. सध्या 6000 रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध आहे. रुग्णालयात असणारा औषधांचा साठा रोज तपासला जातं आहे. ऑक्सिजनची आपली क्षमता 50 मेट्रिक टन आहे. त्यापेक्षा दुप्पट साठा आपल्याकडे आहे. उद्यापासून 2000 सिलेंडर रोज मिळतील, अशी व्यवस्था केली आहे. तसेच उद्योग कारखान्यांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था करत आहोत. तसेच कारखाने बंद राहणार नाहीत याची काळजी घेऊ,” असेही भुजबळांनी सांगितले.

“मास्क घातला नसेल तर दुकानदारांनी व्यवहार करू नये”

“नाशिकचा मृत्यू दर 1.70 टक्के आहे. तर जिल्ह्यात रिकव्हरी रेट 80 टक्क्यांपर्यंत आला आहे. बाहेर फिरताना मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. जर मास्क घातला नसेल तर दुकानदारांनी व्यवहार करू नये,” अशी सूचनाही भुजबळांनी दिली आहे.

“नाशिकमध्ये परमिट रुम सुरु करण्याची परवानगी दिली आहे. सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत परमिट रुम सुरू राहणार  आहेत. मात्र 10 वाजता परमिट रुमचं शटर डाऊन करावं लागणार आहे. तर इतर रेस्टॉरंट हे सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत सुरु राहतील. मात्र इतर व्यावसायिकांनी रात्री 8 वाजता दुकान बंद करावेत,” असेही भुजबळांनी सांगितले. (Chhagan Bhujbal On Maharashtra Unlock)

संबंधित बातम्या : 

MPSC परीक्षा पुढे ढकलल्यास वय निघून जाईल, भरतीआड कोणी येऊ नये : छगन भुजबळ