वीज बिलाविरोधात मनसे करणार सरकारची कोंडी, 26 तारखेच्या आंदोलनासाठी तयारीला सुरुवात

| Updated on: Nov 22, 2020 | 11:14 PM

वाढील बिलाविरोधात 26 तारखेला मनसे राज्यव्यापी आंदोलन करणार असून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पक्षाकडून आदेश देण्यात आले आहेत.

वीज बिलाविरोधात मनसे करणार सरकारची कोंडी, 26 तारखेच्या आंदोलनासाठी तयारीला सुरुवात
Follow us on

मुंबई : लॉकडाऊन काळात आलेलं वाढील वीजबिल कमी होणार नसल्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केल्यानंतर राज्यात एकच राजकीय वातावरण पेटल्याचं पाहायला मिळतं. यासाठी अनेक विरोधी पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामध्ये आता मनसेनंही उडी घेतल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाढीव वीज देयकांबद्दल महाविकास आघाडी सरकार विरोधात मनसेची आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. (MNS started preparations for agitation against the Mahavikas Aghadi government over increased electricity bills)

वाढील बिलाविरोधात 26 तारखेला मनसे राज्यव्यापी आंदोलन करणार असून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पक्षाकडून आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमिवर मनसेच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात बैठकांचं सत्र सुरू आहे. आज उत्तर मुंबईतील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये आंदोलनाची तयारी करण्याच्या सूचना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 2 वाजता नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणखी एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. यामध्येही महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसे मोर्चा काढणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. (MNS started preparations for agitation against the Mahavikas Aghadi government over increased electricity bills)

मनसेचा आक्रमक पवित्रा

वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरही मनसेकडून 26 नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. यात मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकही सहभागी होणार असल्याची माहिती नांदगावकर यांनी दिली. ज्यांना वीज बिलाचा शॉक बसला आहे, अशा सर्व नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन मनसेकडून करण्यात आलं. मनसेचे राज्यभरातील मोर्चे अत्यंत शांतपणे काढले जातील असं नांदगावकर यांनी आवर्जुन सांगितलं.

दादर-माहीम परिसरात होर्डिंगबाजी

‘राज्य सरकारनं वीज दरवाढीत सवलत देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते पाळलं नाही. आता पुन्हा एकदा 100 युनिटपर्यंत सूट देण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री देत आहेत. या सरकारमध्ये सगळा सावळा गोंधळ सुरु आहे,’ अशी टीका नांदगावकर यांनी यावेळी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही वाढीव वीजबिल माफीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. सोमवारनंतर वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याचा निर्धारच मनसेने केला असून दरवाढी विरोधात संपूर्ण दादर-माहीम परिसरात होर्डिंगबाजी केली आहे. (MNS started preparations for agitation against the Mahavikas Aghadi government over increased electricity bills)

मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी हे होर्डिंग लावले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहे. ते राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा विचार करणं ही त्यांची जबाबदारी आहे. आम्ही त्यांना केवळ त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत आहोत, त्यामुळेच ही होर्डिंगबाजी करण्यात आली आहे, असं किल्लेदार यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

नितीन राऊतांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं!, भाजपाचा हल्लाबोल

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, सोमवारी ‘शॉक’साठी तयार राहा; मनसेची माहीम, दादरमध्ये खोचक होर्डिंगबाजी

(MNS started preparations for agitation against the Mahavikas Aghadi government over increased electricity bills)