'माझे लाईट बिल, माझी जबाबदारी', सोमवारी 'शॉक'साठी तयार राहा; मनसेची माहीम, दादरमध्ये खोचक होर्डिंगबाजी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही वाढीव वीजबिल माफीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. सोमवारनंतर वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याचा निर्धारच मनसेने केला असून दरवाढी विरोधात संपूर्ण दादर-माहीम परिसरात होर्डिंगबाजी केली आहे. (mns hoarding in dadar against electricity bill issue)

'माझे लाईट बिल, माझी जबाबदारी', सोमवारी 'शॉक'साठी तयार राहा; मनसेची माहीम, दादरमध्ये खोचक होर्डिंगबाजी

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही वाढीव वीजबिल माफीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. सोमवारनंतर वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याचा निर्धारच मनसेने केला असून दरवाढी विरोधात संपूर्ण दादर-माहीम परिसरात होर्डिंगबाजी केली आहे. ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या घोषणेलाच टार्गेट करत ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’, अशी खोचक वाक्यं या होर्डिंगजवर लिहिण्यात आली आहेत. त्यामुळे या होर्डिंग्ज सध्या चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. (mns hoarding in dadar against electricity bill issue)

वीजबिल माफीच्या विरोधात मनसेने दंड थोपाटले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीजबिल माफ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मनसे अधिक आक्रमक झाली असून उद्या सोमवारपासूनच मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनसेने दादर आणि माहीम परिसरात होर्डिंगबाजी करून राज्य सरकारविरोधात वातावरण निर्मिती केली आहे. ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, आणि ‘तीन तिघाडा, लाईट बिघाडा’, अशा घोषणा या होर्डिंगवर लिहून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. शिवाय सोमवारी भेटूच, शॉकसाठी तयार राहा, असा इशारा देत मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यात आलं आहे.

मनसेनेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी हे होर्डिंग लावले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहे. ते राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा विचार करणं ही त्यांची जबाबदारी आहे. आम्ही त्यांना केवळ त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत आहोत, त्यामुळेच ही होर्डिंगबाजी करण्यात आली आहे, असं सांगतानाच सोमवारी वीजदरवाढी विरोधात आंदोलन करण्याचा आमच्या पक्षाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून तुम्हाला आमचं आंदोलन दिसूनच येईल, असं यशवंत किल्लेदार म्हणाले.

दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात सोमवारनंतर वीजबिल माफीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. सोमवारनंतर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचे मोर्चे निघतील. सरकारला वाढीव वीजबिल माफ करण्यास आम्ही भाग पाडू. तेव्हाही सरकारने ऐकलं नाही तर पुढे उग्र आंदोलनं करावी लागतील. आमची पुढची आंदोलनं कशी असतील त्याचं स्वरुप आता सांगता येणार नाही. सरकार आणि जनतेलाही आमची आंदोलनं कशी असतात हे माहीत आहे, असा इशारा त्यांनी दिला होता.

 

संबंधित बातम्या:

मनसेचा निर्धार, 24 तारखेला ऊर्जामंत्र्यांचा 21 फुटांचा पुतळा जाळणार

सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम, वीजबिल कमी करा अन्यथा उग्र आंदोलन, मनसेचा एल्गार

शरद पवारांच्या शब्दालाही सरकारमध्ये किंमत उरली नाही : बाळा नांदगावकर

(mns hoarding in dadar against electricity bill issue)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *