मोदींना क्लीन चिट प्रकरण : गुजरात दंगलीवर पुन्हा सुनावणी

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

गांधीनगर : गुजरात दंगलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिल्याच्या विरोधात जाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने जाकिया यांची याचिका स्वीकारली असून, 19 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 2002 साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, गुजरात राज्यात हिंदू-मुस्लीम यांच्यात दंगल भडकवल्याच्या आरोपावरून उच्च न्यायालयाने मोदींना क्लीन चिट दिली […]

मोदींना क्लीन चिट प्रकरण : गुजरात दंगलीवर पुन्हा सुनावणी
Follow us on

गांधीनगर : गुजरात दंगलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिल्याच्या विरोधात जाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने जाकिया यांची याचिका स्वीकारली असून, 19 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 2002 साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, गुजरात राज्यात हिंदू-मुस्लीम यांच्यात दंगल भडकवल्याच्या आरोपावरून उच्च न्यायालयाने मोदींना क्लीन चिट दिली होती.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर मंगळवारी(13 नोव्हेंबर) जाकिया यांनी मोदींविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ए. एम. खानविलकर यांचे खंडपीठ सोमवारी (19 नोव्हेंबर) रोजी निकाल देणार आहे.

या आधी ऑक्टेबर 2017 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने एसआयटीने दिलेल्या माहितीनंतर मोदींसह 58 लोकांना दोषमुक्त करण्यात आलं होतं.

दरम्यान, 2002 ला अहमदाबाद येथील गुलबर्ग सोसायटीत झालेल्या जाळपोळीत काँग्रेसचे दिवंगत खासदार एहसान जाफरी यांच्यासह 68 लोकांना जीव गमवाव लागला होता. या घटनेनंतर 2006 साली एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोदींसह अनेक मंत्र्यांवर गुन्हा दाखल केला होता.