AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकार इतिहास रचणार, लवकरच पाण्याखालून मेट्रो धावणार

मुंबई : मोदी सरकार 2021 पर्यंत कोलकातामध्ये अंडरवॉटर मेट्रो सुरु करत आहे. ही मेट्रो भारतीय रेल्वेच्या अंतर्गत काम करणार आहे. कोलकाता मेट्रोने देशातील पहिली अशी वाहतूक सेवा आणली आहे जी पाण्याखालून धावणार आहे. देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोलकात्यातील हुगळी नदीच्या खालून धावणार आहे. कोलकातामध्येच सर्वात पहिली मेट्रो सुरु करण्यात आली होती. आता कोलकातामध्ये पहिल्यांदा […]

मोदी सरकार इतिहास रचणार, लवकरच पाण्याखालून मेट्रो धावणार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 19, 2019 | 10:29 PM
Share

मुंबई : मोदी सरकार 2021 पर्यंत कोलकातामध्ये अंडरवॉटर मेट्रो सुरु करत आहे. ही मेट्रो भारतीय रेल्वेच्या अंतर्गत काम करणार आहे. कोलकाता मेट्रोने देशातील पहिली अशी वाहतूक सेवा आणली आहे जी पाण्याखालून धावणार आहे. देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोलकात्यातील हुगळी नदीच्या खालून धावणार आहे.

कोलकातामध्येच सर्वात पहिली मेट्रो सुरु करण्यात आली होती. आता कोलकातामध्ये पहिल्यांदा पाण्याखालून धावणारी मेट्रो तयार करण्यात येत आहे. ही मेट्रो कोलकात्यातील हुगळी नदी खालून धावणार आहे. त्यासाठी पूर्णपणे तयारी सुरु आहे.

ही ट्रेन चालवण्यासाठी खास बोगदा तयार केला आहे. हा बोगदा 520 मीटर आणि 30 फूट खोल आहे. मेट्रो ही नदीच्या तळापासून 13 मीटर धावेल. प्रत्येक बोगद्याची रुंदी 5.55 मीटर तसेच भींतीची लांबी 275 मीटर आहे.

कोलकाताची ही मेट्रो सॉल्ट सेक्टर 5 वरुन हावडा मैदान यांच्या दरम्यान 16 किलोमीटरचा प्रवास करेल. मेट्रोचा पहिला टप्पा लवकरच सुरु केला जाईल. ज्यामध्ये लोक आपल्या या खास प्रवासाचा अनुभव घेऊ शकतात. विशेष म्हणजे तयार करण्यात आलेला बोगदा पार करण्यासाठी ट्रेनला फक्त 1 मिनिटाचा अवधी लागणार आहे.

या प्रोजेक्टवर 2009 पासून काम सुरु आहे. 2021 पर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. कोलकाता ट्रेनचा दुसरा टप्पा जपानच्या मदतीने पूर्ण केला जाईल. या बोगद्यातून 80 किलोमीटर प्रति तास वेगाने मेट्रो धावणार आहे. या प्रोजेक्टवर 8 हजार 572 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?