पुलवामा हल्ल्यानंतर मोदींकडून पाकिस्तानला 10 इशारे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

नवी दिल्ली : पुलवामात (Pulwama Attack) दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सज्जाड दम दिला आहे. ‘वंदे मातरम’ ट्रेनच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला. शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदल घेऊ, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. पुलवामा हल्ल्यानंतर मोदींकडून पाकिस्तानला 10 इशारे : […]

पुलवामा हल्ल्यानंतर मोदींकडून पाकिस्तानला 10 इशारे
Follow us on

नवी दिल्ली : पुलवामात (Pulwama Attack) दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सज्जाड दम दिला आहे. ‘वंदे मातरम’ ट्रेनच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला. शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदल घेऊ, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

पुलवामा हल्ल्यानंतर मोदींकडून पाकिस्तानला 10 इशारे :

इशारा – एक

जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

इशारा – दोन

दहशतवादी संघटना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

इशारा – तीन

पाकिस्तानने काश्मीरचे स्वप्न पाहणं सोडावं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

इशारा – चार

भारताचा विनाश करण्याचे शेजारी देशाचे (पाकिस्तान) मनसुबे यशस्वी होणार नाहीत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

इशारा – पाच

पुलवामा हल्ल्यामागे जी शक्ती आहे, त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळणारच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

इशारा – सहा

संपूर्ण देश एकजूट होऊन या आव्हानाचा सामना करत आहे. ही वेळ आमच्यासाठी संवेदनशील आहे. मात्र प्रत्येक हल्ल्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

इशारा – सात

आमच्या सुरक्षा यंत्रणांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. आम्हाला त्यांच्या शौर्यावर विश्वास आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

इशारा – आठ

जेवढा तुम्ही विध्वंस कराल, त्याला आम्ही विकासाने उत्तर देऊ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

इशारा – नऊ

दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही खूप मोठी चूक केली आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

इशारा – दहा

प्रत्येक भारतीय नागरिक जवानांच्या सोबत आहे. संपूर्ण देश एकजूट होऊन या आव्हानाचा सामना करत आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुलवामात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत, तर 38 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर बदामीबागच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान 92, 17, 54, 82, 61, 21, 98, 118, 76, 45, 3 आणि 176 या बटालीयनचे होते. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने (Jaish E Mohammed) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आदिल अहमद डार (Adil Ahmad Dar) नावाच्या दहशतवाद्याने हल्ला केला. आदिल हा पुलावामातील काकापोरा भागात राहत होता.

उरी हल्ल्यानंतर सर्वात मोठा हल्ला

उरीमध्ये (Uri Attack) सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. गुरुवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हा हल्ला केला. हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमधील अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले

नेमकं काय घडलं?

दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान असल्याची माहिती आहे.

Pulwama Attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांच्या नावाची यादी

हल्ल्याची माहिती मिळताच भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या. सैन्याकडून वाहतूक बंद करण्यात आली असून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलंय. याशिवाय पुलवामा, शोपिया, कुलगाम आणि श्रीनगर जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. जखमी जवानांवर उपचार सुरु असून वरिष्ठ अधिकारीही घटनेवर नजर ठेवून आहेत.