गुड न्यूज! पुढील 24 तासात राज्यात मान्सून दाखल होणार

| Updated on: Jun 09, 2020 | 3:10 PM

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे राज्यात 11 जूनपासून मान्सूनचा वेग वाढेल (Monsoon will arrive in Maharashtra in next 24 hours).

गुड न्यूज! पुढील 24 तासात राज्यात मान्सून दाखल होणार
Follow us on

पुणे : मान्सूनच्या आगमनाची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस पडला (Monsoon will arrive in Maharashtra in next 24 hours). त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या मान्सूनच्या आगमनाकडे लागल्या आहेत. मात्र आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण पुढील 24 तासात राज्यात मान्सून दाखल होणार आहे. तर 11 जून रोजी त्याचा वेग आणखी वाढणार आहे. हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर अनुपम काश्यपी यांनी ही माहिती दिली. मान्सूनच्या आगमनाची ही गुड न्यूज बळीराजाला सुखावणारी आहे (Monsoon will arrive in Maharashtra in next 24 hours).

मान्सून नेमका कधी आणि कुठे पडेल? याबाबतची सर्वांना उत्सुकता होती. मात्र राज्यामध्ये दहा तारखेला म्हणजे उद्या मान्सूनचे आगमन होईल. तसेच पुढील पाच दिवसात संपूर्ण राज्यात पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 12 जून रोजी पुण्यात आणि 13 जून रोजी मुंबईत मान्सून दाखल होईल.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे राज्यात 11 जूनपासून मान्सूनचा वेग वाढेल. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

कोकण, गोव्यात 11 जूनपासून पुढील पाच दिवस सर्वदूर पाऊस पडेल. अकरा तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात 11 ते 13 जूनपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. नाशिक आणि पुण्याच्या परिसरामध्ये अतिवृष्टी इशारा आहे.

मराठवाड्यात आणि विदर्भात 11 जूनपासून पावसाला सुरुवात होईल. पुढील दोन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातमी:

पहिल्याच आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात, राज्यात यंदा 98 टक्के पाऊस : कृषी हवामान तज्ज्ञ