Sushant Death Case | Painless Death विषयी गुगल सर्च, स्किझोफ्रेनियाचीही माहिती, सुशांतने आत्महत्येपूर्वी काय काय केलं?

सुशांतच्या बिल्डिंगचे 13 अणि 14 जूनचे सीसीटीव्ही फूटेज चेक केले, पण पार्टीबाबत कोणतेच पुरावे आढळले नाहीत, अशी माहिती परमवीर सिंह यांनी दिली.

Sushant Death Case | Painless Death विषयी गुगल सर्च, स्किझोफ्रेनियाचीही माहिती, सुशांतने आत्महत्येपूर्वी काय काय केलं?
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर चाहत्यांच्या अनेक प्रयत्नांनंतरही अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. सीबीआय टीमदेखील सुशांतच्या आत्महत्येमागचं कारण शोधण्यासाठी कसून तपास करत आहे. अशात एम्सच्या अहवालानंतर तपासाला वेगळं वळण लागलं आहे.
Follow us
| Updated on: Aug 03, 2020 | 1:16 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या करण्यापूर्वी गुगलवर ‘पेनलेस डेथ’ (वेदनेविना मृत्यू) याविषयी सर्च केलं होतं, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली. (Mumbai Police CP Param Bir Singh on Sushant Singh Rajput Suicide case)

“सुशांतच्या बिल्डिंगचे 13 अणि 14 जूनचे सीसीटीव्ही फूटेज चेक केले, पण पार्टीबाबत कोणतेच पुरावे आढळले नाहीत. म्हणजेच सुशांतने आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्री म्हणजेच 13 जूनला कुठलीच पार्टी केली नव्हती. त्याने गुगलवर ‘पेनलेस डेथ’ (वेदनेविना मृत्यू) याविषयी सर्च केलं. बायपोलर डिसॉर्डर, स्किझोफ्रेनिया याबद्दलही सर्च केलं होतं” अशी माहिती परमवीर सिंह यांनी पत्रकारांना दिली.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत 56 जणांचे स्टेटमेंट घेण्यात आले आहेत. मुंबई पोलीस, वांद्रे पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत. आर्थिक, आरोग्यविषयक तसंच इतर सर्व बाजूने तपास सुरु आहे, असे परमवीर सिंह यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांनी 16 जूनला सुशांतच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवला होता. त्यावर त्यांचे हस्ताक्षरही आहे. चौकशी काळात सुशांतच्या वडील, बहीण, मेहुणा यांचे जबाब घेतले. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केले नव्हते. त्याच्या वडिलांनी नंतर बिहारमध्ये तक्रार दाखल केली, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा : ‘आता बास झालं, मुंबई पोलीस आमची शान, आमचा गर्व’, मराठी दिग्दर्शक खवळला

मुंबई पोलिसांना या सगळ्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं आहे, पण कुणी समोर येत नाहीये. एखाद्या राज्यात घटना घडली असेल तर त्याचा तपास त्याच राज्याचे पोलीस करतात. याबाबत आम्ही अधिक कायदेशीर माहिती घेत आहोत. पाटणा पोलिसांनी झीरो एफआयआरने गुन्हा मुंबईत ट्रान्सफर करायला हवा होता, असा तपास कधीच होत नाही, असेही परमवीर सिंह म्हणाले.

सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियान आत्महत्या प्रकरणातील कोणतीच फाईल डिलीट झाली नाही, तपास सुरुच आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

बिहारच्या एसपींच्या होम क्वारंटाईनवर वाद

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने होम क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला होता. त्यानंतर देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली ठरवण्यात आली आहे, त्यानुसार पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यात आले, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिले आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा आढावा घेताना तपासामध्ये पारदर्शकता ठेवण्याबरोबरच चोख तपास करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

संबंधित बातम्या :

बिहार पोलीस सुशांतच्या मॅनेजरच्या आत्महत्येचीही चौकशी करणार

सुशांतचा नोकर सॅम्युअल मिरांडाच्या घराबाहेर मुंबई पोलीस तैनात, बिहार पोलिसांकडूनही तपासाचा धडाका 

(Mumbai Police CP Param Bir Singh on Sushant Singh Rajput Suicide case)

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.