‘आता बास झालं, मुंबई पोलीस आमची शान, आमचा गर्व’, मराठी दिग्दर्शक खवळला

'तुम्ही आमची शान आहात, आमचा गर्व आहात', असं म्हणत मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांची पाठराखण केली (Kedar Shinde on Sushant Singh suicide case).

'आता बास झालं, मुंबई पोलीस आमची शान, आमचा गर्व', मराठी दिग्दर्शक खवळला
Follow us
| Updated on: Aug 03, 2020 | 10:32 AM

मुंबई : ‘तुम्ही आमची शान आहात, आमचा गर्व आहात’, असं म्हणत मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांची पाठराखण केली (Kedar Shinde on Sushant Singh suicide case). बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरु असतानाच बिहार पोलिसांनी यात एन्ट्री केली. बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप केला. मुंबई पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित करत हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणीही होत आहे. याच पार्श्वभूमीवर केदार शिंदे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी ट्विट करत आपली सडेतोड भूमिका मांडली.

केदार शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “आता बास्स झालं. मुंबई पोलीस तुम्ही आमची शान आहात. सतत तुमच्या विषयी नकारात्मक बातम्या सुरु आहेत. कुणीही येतंय आणि टिकली वाजवून जातंय. तोंडावर त्यांना पुरावे देऊन या. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा समारोप करा! तुमच्यावर आम्हाला गर्व आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याचं नक्कीच दु:ख आहे. त्याच्या प्रकरणाचा छडा लावाच! पण या काही दिवसांमध्ये हिंदी/इंग्रजी/मराठी वृत्तवाहिन्यांवर फक्त त्याच्यावरचे एपिसोड पाहून चिंता वाटतेय. लोकांना वेगळ्याच घटनेत गुंतवून देशासमोरचे महत्वाचे विषय बाजूला सारले जात आहेत. हे जाणीवपुर्वक चाललंय का?” असाही सवाल केदार शिंदे यांनी विचारला.

दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता सुशांतच्या बहिणीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं (Sushant Singh sister appeal PM Modi). तसेच या प्रकरणातील पुराव्यांशी कोणतीही छेडछाड होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

फडणवीसांकडून CBI चौकशीची मागणी, सुशांत प्रकरणात नव्या घडामोडी

या प्रकरणाला आता राजकीय वळणदेखील मिळताना दिसत आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी ट्विटद्वारे केली आहे. तर बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी अनेकांची मागणी आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या वागणुकीकडे बघितल्यावर तसं होणार नाही. पण याप्रकरणी ईडीने तरी ईसीआयआर दाखल करुन मनी लॉन्ड्रिंग आणि मनी ट्रेलिंगबाबत चौकशी करावी”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत (Devendra fadnavis demand CBI inquiry on Sushant Singh Rajput suicide case).

“बिहार पोलिसांच्या तपासात मुंबई पोलीस अडथळा आणत आहेत. बिहार पोलीस याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. मात्र, मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळताना दिसत नाही. त्यामुळे सीबीआयने याप्रकरणाची दखल घ्यावी, असं भाजपला वाटतं”, असं सुशील कुमार मोदी म्हणाले आहेत.

हेही वाचा :

Sushant Rajuput case | पाटणा पोलीस कोटक बँकेत, तपास CBI नव्हे तर मुंबई पोलिसांकडेच

फडणवीसांकडून CBI चौकशीची मागणी, सुशांत प्रकरणात नव्या घडामोडी, रियाचा खंडणीबाबतचा व्हिडीओ व्हायरल

बिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात, मुंबई पोलिसांकडून नियम सांगत एसआयटीला समज

पुराव्यांशी छेडछाड होऊ नये, या प्रकरणात लक्ष द्या, सुशांतच्या बहिणीचं पंतप्रधान मोदींना आवाहन

Kedar Shinde on Sushant Singh suicide case

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.