Weather Alert: मुंबई, ठाण्यासह राज्यभर रेड अलर्ट, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

| Updated on: Oct 15, 2020 | 8:07 AM

आजही राज्यात असात मुसळधार पाऊसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उत्तर कोकणासह मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अर्लट जारी करण्यात आला आहे.

Weather Alert: मुंबई, ठाण्यासह राज्यभर रेड अलर्ट, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
Follow us on

मुंबई : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यभर मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. आजही राज्यात असात मुसळधार पाऊसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उत्तर कोकणासह मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. तर उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज 15 ऑक्टोबरला रेड अर्लटसह अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मुंबईमध्ये रात्री सतत पाऊस सुरू असल्याने दादर हिंदमाता परिसरात ठिकठिकाणी पाणी तुंबलं आहे. वसई-विरार नालासोपाऱ्यात रात्रभर रिमझिम पाऊस सुरू आहे. आभाळ पूर्णपणे भरलेले असून दिवसभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. साउथ मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सातारा, सांगलीमध्ये पावसाचा जोर कायम आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

दक्षिण कोकणामध्ये असेल रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही रेड अलर्ट जारी केलेला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर असेल. उत्तर कोकणामध्ये, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे रत्नागिरीत रात्रीपासून पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळाल्या. किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम आहे. सध्या किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहेत. किनारी भागात 35 ते 40 किलोमिटर वेगाने वारे वाहतायत.

Maharashtra Rain LIVE | राज्यात दमदार पाऊस, उत्तर कोकणासह मुंबई ठाण्यात रेड अलर्ट

13 ऑक्टोबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात कोसळधारा
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, 13 ऑक्टोबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात किनारपट्टीलगच्या सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या चक्रीवादळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी तेलंगणात मुसळधार ते अतिमुसळधार (heavy to very heavy falls) पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कर्नाटक, रायलसीमा, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुर्गम भागांतही जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर, उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि विदर्भातील दुर्गम भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मच्छिमारांना अलर्ट जारी
पुढील 24 तासात ते दिनांक 17 ऑक्टोबर 2020 रोजीपर्यंत किनारपट्टीवर 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिली असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये.

Corona Vaccine | “साईड इफेकट्स’चा धोका”, 24 तासात 2 कोरोना लसींच्या चाचण्यांवर बंदी