माझ्या वडिलांनी त्यांच्या दुसऱ्या बायकोला मारहाण…, लोकप्रिय अभिनेत्रीच्या सावत्र मुलीचा खळबळजनक खुलासा

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी विवाहित पुरुषांसोबत लग्न केलं आणि स्वतःचं चांगलं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्यानंतर घटस्फोट घेतला. बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीसोबत देखील असंच काही झालं आहे. जिने नवऱ्यावर मारहाण केल्याचे आरोप केलेले. यावर अभिनेत्रीच्या सावत्री मुलीने अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा केलाय...

माझ्या वडिलांनी त्यांच्या दुसऱ्या बायकोला मारहाण..., लोकप्रिय अभिनेत्रीच्या सावत्र मुलीचा खळबळजनक खुलासा
| Updated on: Jul 04, 2026 | 3:36 PM

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून झीनत अमान आहे… बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर असताना झीनत यांनी संजय खान यांच्यासोबत लग्न केलं. झीनत यांच्यासोबत संजय यांचं दुसरं लग्न होतं. एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त झीनत – संजय यांच्या रिलेशनशिपची चर्चा असायची. पण एक दिवस असा आला, जेव्हा झीनत यांनी संजय यांच्यावर गंभीर आरोप केले. संजय यांनी मारहाण केल्यामुळे, डोळ्याला जखम झाली.. असं झीनत म्हणालेल्या. पण यावर संजय खान यांची मुलगी फराह खान अली हिने पहिल्यांदा मोठा खुलासा केला आहे.

सांगायचं झालं तर, 1979 मध्ये एका पंचतारांकित हॉटेलमधील कार्यक्रमादरम्यान संजय खान यांनी झीनत अमान यांना मारहाण केली होती; या घटनेमुळे त्यांच्यातील नातं संपुष्टात आलं. आता, अनेक वर्षांनंतर संजय खान यांची मुलगी फराह खान अली हिने दुजोरा दिला आहे की, तिचे वडील आणि झीनत अमान यांचा विवाह झाला होता, मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्या वेळी संजय खान हे झरीन खान यांच्याशी विवाहित होते; त्यांना तीन मुली होत्या आणि चौथं मुल जन्माला येणार होतं.

झीनत आणि संजय यांच्या लग्नाबद्दल फराह खान अली म्हणाली, ‘दोघांचं लग्न झालं होतं. पण फार काळ टिकलं नाही. मुस्लीम पद्धीत दोघांचं लग्न झालं आणि घटस्फोट देखील मुस्लीम पद्धतीत झाला.’, यावेळी फराह हिने मारहाणीचे देखील आरोप देखील फेटाळले आहेत. ‘माझ्या वडिलांनी कधीच माझ्या आईवर आणि मुलींवर हात उचललेला नाही. ते हिंसक व्यक्ती नाहीत. झीनत यांना जी समस्या होती ती, अनुवांशिक होती. माझ्या आईने मला सांगितलं होतं, झीनत यांच्या आईला एक आजार असल्यामुळे त्यांचा डोळा लहान आहे. तोच आजार झीनत यांना देखील असल्याने त्यांचा डोळा लहान आहे. त्यामुळे माझ्या वडिलांनी त्यांच्या दुसऱ्या बायकोला मारलं हे, पूर्णपणे खोटं आहे. ‘

पुढे फराह म्हणाली, ‘आईने आम्हाला सांगितलं होतं की, आमच्या वडिलांचा जीव झीनत यांच्यावर जडलेला, त्यामुळे माझ्या आईने कधीच एकट्या झीनत यांना जबाबदार ठरवलं नाही.’ झीनत आणि संजय यांच्या नात्याबद्दल सांगायचं तर, दोघांनी गुपचूप लग्न केलं होतं. 1978 मध्ये झीनत आणि संजय यांनी लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही अखेर 1979 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

Follow Us