प्रसुतीनंतर 20 वर्षीय कोरोनाग्रस्त मातेचा अखेरचा श्वास, बाळ सुरक्षित

| Updated on: Jul 30, 2020 | 8:49 AM

डिलीव्हरीनंतर कोरोना रुग्ण बाळंतीणीच्या मृत्यूची नागपुरातील ही पहिलीच घटना आहे.

प्रसुतीनंतर 20 वर्षीय कोरोनाग्रस्त मातेचा अखेरचा श्वास, बाळ सुरक्षित
अमानुष ! पश्चिम बंगालमध्ये तृतीयपंथियाचा कहर
Follow us on

नागपूर : प्रसुतीनंतर कोरोनाग्रस्त मातेने अखेरचा श्वास घेतल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात समोर आली आहे. महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला, मात्र प्रसुतीनंतर काही क्षणातच कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले. बाळंतीणीचा मृत्यू झाला असला, तरी सुदैवाने नवजात बाळ सुरक्षित आहे. (Nagpur Corona Positive lady dies after giving birth to baby)

संबंधित 20 वर्षीय गर्भवतीला अत्यवस्थ स्थितीत बुधवारी ‘मेयो’त उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रसववेदना होत असल्याने तिला मेयोतील कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

गरोदरपणातील व्याधी (प्रेग्नंसी हायपरटेन्शन) असलेल्या गर्भवतीला अतिदक्षता विभागात दाखल करुन कृत्रिम श्वासोच्छ्वास प्रणालीवर उपचार सुरु होते. त्यानंतर असह्य प्रसुतीवेदना येत असल्याने तिला तातडीने लेबर रुममध्ये शिफ्ट करण्यात आले.

हेही वाचा : जुळ्या बाळांना जन्म देऊन सुखरुप ठेवलं, कोरोनाग्रस्त माऊलीने 24 तासात डोळे मिटले!

व्हेंटिलेटरवर ठेवून मेयोतील डॉक्टरांनी तिची डिलीव्हरी केली. प्रसुतीनंतर बाळ सुरक्षित आहे, मात्र दुर्दैवाने 20 वर्षीय आईने प्राण सोडले. या घटनेने कुटुंबासह रुग्णालयातील नर्स आणि कर्मचारीही हळहळले. डिलीव्हरीनंतर कोरोना रुग्ण बाळंतीणीच्या मृत्यूची नागपुरातील ही पहिलीच घटना आहे.

हेही वाचा : ‘कोरोना’ने आठ दिवसांच्या बाळाचं मातृछत्र हिरावलं

नागपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून बुधवारी यात आणखी 305 रुग्णांची भर पडली. नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 4 हजार 792 वर गेली आहे. नागपुरातील मृतांचा आकडा 107 झाला आहे. आतापर्यंत 3069 जण कोरोनामुक्त झाले असून 1616 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

याआधी, ‘कोरोना’मुळे अवघ्या आठ दिवसात नवजात बालकाचे मातृछत्र हिरावल्याचं वृत्त औरंगाबादेत समोर आलं होतं. कोरोनाबाधित बाळंतीणीचा प्रसुतीनंतर आठवड्याभराने मृत्यू झाला होता.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

अहमदनगरमधील ओल्या बाळंतीणीने जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर 24 तासात जगाचा निरोप घेतल्याची करुण कहाणी गेल्याच महिन्यात  समोर आली होती.