नागपुरात कोरोनाची साखळी वाढली, कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील 55 जणांना कोरोना

| Updated on: Apr 23, 2020 | 5:31 PM

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही नागपुरातही कोरोना रुग्णांची (Nagpur Corona Positive Patient) संख्या झपाट्याने वाढली आहे.

नागपुरात कोरोनाची साखळी वाढली, कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील 55 जणांना कोरोना
Follow us on

नागपूर : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही नागपुरातही कोरोना रुग्णांची (Nagpur Corona Positive Patient) संख्या झपाट्याने वाढली आहे. देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये गेल्या 22 दिवसात तब्बल 75 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढले. त्यामुळे नागपूर शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 98 वर पोहोचला आहे.

नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांचा (Nagpur Corona Positive Patient) आकडा 98 वर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसात शहरात 18 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. नागपुरातील सतरंजीपुरा हा परिसर विदर्भातील कोरोनाचे सर्वात मोठं हॉटस्पॉट ठरला आहे. या परिसरातील एका 68 वर्षीय कोरोना रुग्णाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.

त्या मृत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 55 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. म्हणजे एका व्यक्तीमुळे नागपूर शहरात कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पटीने वाढला आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना नागपूरमध्ये सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांचा आकडा स्थिर होता. मात्र काही कंटेनमेंट झोनमध्ये 14 दिवसात नवे रुग्ण न आढळल्याने पालिकेतर्फे पाच कंटेनमेंट झोन बंद करण्यात आले.

मात्र सतरंजीपुरा परिसरातील मृत कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने नागपुरातील कोरोनाची साखळी वाढली. या एका रुग्णापासून तब्बल 55 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागपूरला कोरोनामुक्त करायचं असेल तर ही साखळी तोडणं गरजेचं (Nagpur Corona Positive Patient) आहे.

संबंधित बातम्या : 

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, पुण्यातील उरुळी गावात टँकरभोवती नागरिकांची झुंबड

अख्खा एसटी डेपो दवाखान्यात बदलला, भोर डेपोत मोफत फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु