sweet food will get to patient of medical : दिवाळीत मेडिकलमधील रुग्णांना मिळणार गोड जेवण, वैद्यकीय अधीक्षक अविनाश गावंडे यांची माहिती

नागपूर : मेडिकलमध्ये दिवाळीत रुग्णांसाठी गोड जेवणाची व्यवस्था करण्यात आालीय. रुग्णांना घरापासून दूर आहोत याची जाणीव होऊ नये, यासाठी ही व्यवस्था केल्याचं वैद्यकीय अधीक्षक अविनाश गावंडे यांनी सांगितलंय.

sweet food will get to patient of medical : दिवाळीत मेडिकलमधील रुग्णांना मिळणार गोड जेवण, वैद्यकीय अधीक्षक अविनाश गावंडे यांची माहिती
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 5:24 PM

नागपूर : मेडिकलमध्ये दिवाळीत रुग्णांसाठी गोड जेवणाची व्यवस्था करण्यात आालीय. रुग्णांना घरापासून दूर आहोत याची जाणीव होऊ नये, यासाठी ही व्यवस्था केल्याचं वैद्यकीय अधीक्षक अविनाश गावंडे यांनी सांगितलंय.

घरच्यासारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न

मेडिकलकडं गरिबांचं रुग्णालय म्हणून बघीतलं जातं. विदर्भाव्यतिरिक्त मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील रुग्ण इथं उपचार घेतात. त्यांना आपण घराबाहेर आहोत, असं वाटू नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आलाय. घरच्यासारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. रुग्णांना औषधासोबत प्रेम देण्याची गरज असते. या उपक्रमातून त्यांचं मनोबल निश्चितच वाढणाराय.

रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मेडिकलमध्ये छोट्यापासून मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. दिवाळीपूर्वी रुग्णालयात भरती झालेल्यांना घरी जाता येणार नाही. दिवाळीचा आनंद घेता येणार नाही. ही बाब लक्ष्यात घेऊन मेडिकल प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. यामुळं रुग्णांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलविण्यास मदत होणाराय.

नागपुरात दिवाळी उत्सवा संदर्भात सूचना जारी … देवेंद्र फडणवीसांचं मिशन

Nagpur Corona Update | नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट, 24 तासात …