नागपुरात पेट्रोल पंपावर हल्ला, कर्मचारी जखमी, हल्लेखोरांमध्ये दोन तरुणी

नागपूरच्या टेलिफोन एक्स्चेंज चौकातील जय दुर्गा ऑटोमोबाइल पेट्रोल पंपावर बुधवारी सकाळी हल्ला झाला होता.

नागपुरात पेट्रोल पंपावर हल्ला, कर्मचारी जखमी, हल्लेखोरांमध्ये दोन तरुणी

नागपूर : नागपुरात पेट्रोल पंपावर हल्ला करणारे सहा आरोपी (Nagpur Petrol Pump Attack) सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. विशेष म्हणजे सहा जणांमध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. टोळक्याच्या हल्ल्यात पेट्रोल पंपावरील कर्मचारी जखमी झाला होता.

नागपूरच्या टेलिफोन एक्स्चेंज चौकातील जय दुर्गा ऑटोमोबाइल पेट्रोल पंपावर काल (बुधवारी) सकाळी हा हल्ला झाला होता. दोन दुचाकींवर ट्रिपल सीट बसलेले सहा जण पेट्रोल पंपावर आले होते. पेट्रोल भरल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले, तेव्हा सहा जणांनी वाद घालायला सुरुवात केली.

वादावादीनंतर सहा जणांनी धारदार शस्त्रांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला होता.

सहा जणांपैकी एका हल्लेखोराला पकडण्यात पेट्रोल पंपावरील कर्मचारी यशस्वी ठरले होते. मात्र इतर हल्लेखोर दुचाकीवर बसून पसार झाले.

हल्लेखोरांचे कृत्य पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले होता. धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांमध्ये दोन तरुणींचाही सहभाग असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Nagpur Petrol Pump Attack)

नागपुरातील गुन्हेगारीत गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हत्या, बलात्कार, खंडणी, अपहरण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI